Make apple jam at home Nagpur news 
फूड

घरच्या घरीच तयार करा ॲपल जाम; बाजारातून खरेदी करण्याची गरज काय?

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक फळ मिळतात. ही फळे आपण मनभरेपर्यंत खातो. पण ही फळ वर्षभरासाठी टिकवून ठेवू शकत नसल्यामुळे त्याचा मुरांबा, साखरांबा करून ठेवतात. असाच मुरांबा किंवा जॅम आपल्याला ॲपलपासून तयार करात येते. जेव्हा आपण कमी किमतीत सहजपणे ॲपल जॅम घरी बनवू शकतो तर बाजारातून खरेदी करण्याची गरज काय?

ब्रेड, लोणी आणि जॅमशिवाय न्याहारी पूर्ण होत नाही. ऑफिसला जाताना किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर निघताना सकाळी घरी काहीही तयार झालेले नसते. कारण, ही वेळ मुळात स्वयंपाकाची नसते. अशावेळी काहीतरी खाऊन बाहेर पडायचे असेल तर प्रथम ब्रेड आणि जॅमच्या दिशेने आपले पाय वळतात.

मुलांचा सर्वांत आवडता नाश्ता म्हणजे ब्रेड आणि जॅम. परंतु, जॅम खरेदी करणे इतके सोपे नाही. कारण, एका जॅमच्या बाटलीची किंमत सुमारे शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत जेव्हा आपण सहजपणे घरी कमी खर्चिक आणि अधिक स्वादिष्ट जॅम बनवू शकतो, तर मग बाजारातून का विकत घ्यायचा. चरा तर जाणून घेऊया घरच्या घरी कसा तयार करायचं ॲपल जॅम...

ॲपल जॅमसाठी लागणारी सामग्री

एक किलो सफरचंद, पाचशे ग्रॅम साखर पावडर, लिंबू, एक चमचा वेलची पूड व अर्धा चमचा दालचिनी पावडर

असा तयार करा जॅम

सफरचंदच जॅम करण्यासाठी प्रथम सफरचंद कापून बिया वेगळे करा. कारण, बिया काढल्याशिवाय जॅम तयार होणार नाही. बिया काढल्यानंतर एका पाणी भरलेल्या भांड्यात सफरचंद ठेवा. यामुळे दुसऱ्या दिवशी उकळायला त्रास होणार नाही. याचा दुसरा लाभ म्हणजे जॅम मऊ होईल. दुसऱ्या दिवशी तेच पात्र गॅसवर ठेवा आणि सफरचंद मऊ होईपर्यंत चांगले उकळा. उकळल्यानंतर सफरचंद पाण्यामधून काढा आणि मिक्सरमध्ये बारीक करा.

दुसऱ्या भांड्यात साखरेचे पावडर टाका. थोड्या वेळाने बारीक केलेले सफरचंद टाका आणि पाच मिनिटापर्यंत शिजवा. सहाव्या मिनिटाला यात लिंबाचा रस, वेलची पूड आणि दालचिनी पावडर टाकून परत एकदा परतून घ्या. जवळपास पाच मिनिट शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि न्याहारीसाठी बाहेर काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT