Healthy Breakfast esakal
फूड

Healthy Breakfast : रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून बनवा चमचमीत अन् पौष्टिक रोटी बॉल्स, वाचा रेसिपी

तुमच्या रात्रीच्या उरलेल्या चपात्यासुद्धा आता वाया जाणार नाही. त्याचे तुम्ही यम्मी रोटी बॉल्स बनवू शकता

सकाळ ऑनलाईन टीम

Healthy Breakfast Recipe : रोज नाश्त्याला काहीतरी नवीन खावसे वाटते ना? साहाजिकच आहे की तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो. तेव्हा काहीतरी चटपटीत वेगळं खायची इच्छा होते. अशांसाठीच ही रेसिपी आज आपण घेऊन आलो आहोत. तुमच्या रात्रीच्या उरलेल्या चपात्यासुद्धा आता वाया जाणार नाही. त्याचे तुम्ही यम्मी रोटी बॉल्स बनवू शकता. तेव्हा जाणून घ्या रेसिपी.

रोटी बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- उरलेल्या चपात्या

- १ कांदा

- शिमला मिरची

- कापलेले गाजर

- अर्धा चमचा लाल तिखट

- अर्धा चमचा काली मिरी पावडर

- चवीनुसार मीठ

रेसिपी

रोटी बॉल्स बनवण्यासाठी उरलेल्या चपात्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. एका भांड्यात हे तुकडे घाला त्यात चार ते पाच मोठे चमचे पाणी घालून ते भिजू द्या, वेगळ्या भांड्यात कांदा किसून घ्या.

त्यात शिमला मिरची गाजर कोथिंबीर मीठ लाल तिखट आणि काली मिरी पावडर घालून चांगलं एकजीव करून घ्या. भिजलेल्या चपाती मध्ये हे सर्व मिश्रण घाला आणि चपातीचज्या पिठाप्रमाणे मळून घ्या, या नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि तेलात ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. (Food)

झालेत तुमचे गरमा गरम अन् टेस्टी रोटी बॉल्स तयार

काहींना शिळ्या चपात्या अजिबात आवडत नाही. तेव्हा अशांसाठी या चपात्या टेस्टी बनवण्यास ही रेसिपी मदत करेल. तर एरवी शिळी चपाती बघून दूर पळणारी लोक ही रेसिपी अगदी आवडीने ट्राय करतील . सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी हेल्दी आहे. (Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT