Independence Day sakal
फूड

Independence Day 2023: चविष्ट आणि पौष्टिक तिरंगा सँडविच कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला चविष्ट आणि पौष्टिक तिरंगा सँडविच कसा तयार करायचा याची रेसिपी सांगणार आहोत.

Aishwarya Musale

दरवर्षी स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिनाची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. महाविद्यालये आणि शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी प्रत्येकजण तिरंग्याच्या रंगात रंगलेला दिसत आहे. काही लोक या निमित्ताने प्रवास करण्याचा विचार करतात, तर काहीजण घरी राहून खास पदार्थ बनवून हा दिवस साजरा करतात.

यावेळी तुम्ही ट्राय कलर सँडविच बनवू शकता. हे सँडविच बनवणे खूप सोपे आहे. यासोबतच ते खूप चविष्ट देखील आहे. हे सँडविच तुम्ही घरी सहज कसे बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो

साहित्य

  • ब्रेडचे ४ स्लाईस घ्या

  • 1 गाजर - किसलेले

  • २ चमचे टोमॅटो केचप

  • 4 चमचे मेयॉनीज

  • 1 काकडी

  • एक चिमूटभर मीठ आणि मिरपूड

  • 5 चमचे पनीर

  • हिरवी चटणी

तिरंगा सँडविच रेसिपी

स्टेप – 1

सर्व प्रथम ब्रेडचे चारी काठ काढा. यानंतर त्यांना वेगळे ठेवा.

स्टेप – 2

यानंतर ऑरेंज स्प्रेड तयार करा. यासाठी २ चमचे टोमॅटो केचप घ्या. त्यात २ चमचे मेयोनीज घाला. आता स्प्रेडमध्ये किसलेले गाजर घाला. आता ते चांगले मिसळा.

स्टेप – 3

आता या मिश्रणात चिमूटभर मीठ आणि काळी मिरी घाला. अशा प्रकारे तुमचे केशरी रंगाचे स्टफिंग तयार होईल.

स्टेप – 4

एका वेगळ्या भांड्यात काकडी किसून घ्या. या काकडीचे अतिरिक्त पाणी काढा. काकडीच्या ऐवजी सिमला मिरची देखील वापरू शकता.

स्टेप - 5

आता कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ वापरून हिरवी चटणी तयार करा. ही चटणी काकडीच्या पेस्टमध्ये मिसळा. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. त्यात चिमूटभर मीठ आणि काळी मिरी पावडर टाकू शकता.

स्टेप - 6

एका भांड्यात ५ चमचे किसलेले पनीर घ्या. त्यात मेयो घाला. आता दोन्ही चांगले मिक्स करून घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि काळी मिरी पावडरही घाला.

स्टेप - 7

यानंतर ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावा. सर्व प्रथम एका ब्रेडवर हिरवी चटणी लावून हिरवी स्प्रेड लावा. यानंतर, दुसऱ्या ब्रेड स्लाइसने बंद करा.

स्टेप - 8

आता बंद ब्रेडवर पांढरा स्प्रेड लावा. तिसऱ्या ब्रेडने झाकून ठेवा. आता ऑरेंज सॉस लावून त्यावर पसरवा. यानंतर हे सँडविच चौथ्या ब्रेड स्लाइसने झाकून ठेवा.

स्टेप - 9

आता हे सँडविच मधोमध कापून घ्या. ते कापण्यापूर्वी तुम्ही त्यात टूथपिक लावू शकता. यानंतर हे सँडविच सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT