मुंबई वडापाव 
फूड

World Vadapav Day 2021 : मुंबई वडापाव बनवा घरी, ही आहे रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

World Vadapav Day 2021 : मुंबई वडापाव सगळ्यांना आवडेल असा. तर चला मुंबई वडापावची रेसिपी जाणून घेऊ या...

साहित्य

- सहा पाव

- तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे

- दीडशे ग्रॅम बेसण

- चवीनुसार मीठ

- अर्धा चमचा मिरची पावडर

- एक छोटा चमचा धनिया पावडर

- एक छोटा चमचा हळदी

- एक छोटा चमचा रायचे दाणे

- एक चमचा कढीपत्ता

- एक छोटा चमचा आमचूर पावडर

- एक छोटा चमचा अद्रक आणि लसूण पेस्ट

- दोन चिमूटभर हिंग

- एक मोठा लिंबाचा रस

- तळण्यासाठी तेल

- अर्धा ग्लास पाणी

कृती

- सर्वप्रथम बेसणमध्ये सर्व साहित्य टाकून एकत्र करुन घ्या. त्यात थोडे-थोडे पाणी टाकून त्याचे चांगल्या प्रकारे पेस्ट बनवून घ्या. पाणी टाकताना ते हलवत चला. पेस्ट थोड घट्ट बनवा.

- आता त्यात लिंबाचा रस टाका. याने बेसण पेस्टमध्ये स्क्रिपीपणा येईल.

- आता मसाला बनवयाचे. एका कढाईत दोन चमचे तेल टाकून त्याला गरम करा. त्यानंतर त्यात एक चमचा रायचे दाणे टाका. ते चांगले तळून घ्या. त्यानंतर कढीपत्ता टाका. आता अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाका. हलका ब्राऊन कलर आल्यावर त्यात उकडलेले बटाटे बारीक करुन टाका. काही वेळेने स्वादनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, आमचूर पावडर टाकून ते चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. ते तीन ते ४ मिनिटे गॅस ठेवा. त्यानंतर त्यात बारीक केलेली कोथिंबीर टाका. त्यानंतर बटाटा चटणी थंड होण्यासाठी ठेवा. नंतर हाताने एकत्र करा.

- आता बटाटा चटणीचे छोटे गोलाकार गोळे बनवा.

- कढाईत तेल गरम होण्यासाठी ठेवा. नंतर बटाटा चटणीचे गोळे बेसणमध्ये बुडवून तेलात तळण्यासाठी सोडा. ते दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे तळून घ्या. नंतर ते तेलातून काढून घ्या.

- पावसाठी स्पेशल चटणी बनवली जाते. त्यासाठी बारीक केलेला खोबरा, आठ लसणाच्या पाकळ्या, चार ते पाच सुकलेल्या लाल मिरच्या, अर्धा कप शेंगदाणे. हे सर्व तळून घ्या. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यात पाणी टाकू नका.

- या चटणीबरोबर खा वडापाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT