Paneer Pakode Recipe: जून महिना महिना म्हटलं की पावसाचे वेध लागतात आणि पाऊस म्हटलं की गरमागरम भजी आणि चहाचा बेत. भारतात खरं तर अनेक भाज्यांची भजी नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून बनवली जातात. Make Paneer Pakoda at home in this monsoon
कांदा भजी, बटाटा भजी, पालक, कोबी अशा अनेक भाज्यांच्या भजी चविष्ट बनतात. यातच पनीर भजी Paneer Pakoda हा देखील एक चविष्ट आणि प्रोटीनयुक्त भजीचा प्रकार आहे. पावसाळ्यामध्ये Monsoon तुम्ही घरच्या घरी झटपट आणि यम्मी असे पनीर पकोडे नक्की ट्राय करू शकता. Paneer pakode
पनीर पकोड्यांसाठी लागणार साहित्य
२०० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम बेसन, २-३ चमचे तांदळाचं पीठ, १ चमचा जीरं पावडर , १ चमचा लाल मसाला, १ चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा, चाट मसाला, बारीक चिरलेली १ हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, ब्रेड क्रम्प्स , तळणायासाठी तेल
पनीर पकोड्यांची कृती (Paneer Pakode Recipe)
पनीर पकोडे तयार करण्यासाठी सर्व प्रथम पनीरचे उभे लांब मध्यम आकाराचे तुकडे करावे, साधारण बोटाच्या आकाराचे हे तुकडे असावे.
एका प्लेटमध्ये पनीरचे तुकडे ठेवून त्यावर अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जीर पावडर लावून २० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
पनीर पकोड्याचं कोटिंग तयार करण्यासाठी एका वाडग्यात बेसन आणि तांदळाचं पीठ घ्यावं.
यात अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, चिरलेली मिरची आणि कोथिंबीर, हिंग तसंच चाट मसाला टाकावा. यात थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण घट्ट तयार करावं.
आता गॅसवर एका कढईत तेल तापवतं ठेवा.
एका बाऊलमध्ये ब्रेड क्रम्प्स घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाका.
मसाला लावलेले पनीरचे तुकडे सर्वप्रथम बेसणच्या मिश्रणात डीप करा. त्यानंतर ब्रेड क्रम्पमध्ये पनीरचे तुकडे टाकून संपूर्ण तुकड्यांना पनीर लागेल असे घोळवा.
हे पनीर तेलांत मध्यम आचेवर सोनेरे रंग येईपर्यंत तळून घ्या.
तळलेले पनीर पकोडे एका टिश्यू पेपरवर काढा.
अशा प्रकारे बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे चटकदार पनीर पकोडे तयार होतील. या गरमा गरम पकोड्यांची मजा तुम्ही पुदीना चटणी किंवा टॉमेटो कॅचअपसोबक घेऊ शकता. तेव्हा यंदाच्या पावसाळ्यामध्य आपल्या कुटुंबियांसोबत पनीर पकोड्यांचा बेत नक्की आखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.