Homemade Veg Momos Recipe sakal
फूड

Homemade Veg Momos Recipe: घरच्या घरी तयार करा हॉटेलसारखे चविष्ट व्हेजिटेबल मोमोज! लगेच नोट करा रेसिपी

How to make veg momos at home like restaurant: हॉटेलसारखा स्वाद देणारे चविष्ट व्हेज मोमोज आता घरच्या घरी बनवा – सोप्या पद्धतीने!

सकाळ वृत्तसेवा

Restaurant-Style Vegetable Momos in Marathi: रविवार म्हणलं की नेहमीच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाऊ खाण्याची सगळ्यांची इच्छा असते. त्यात बाहेरच्या रस्त्यावर मिळणाऱ्या वाफाळत्या मोमोजचा मोह कुणाला टाळता येतो? पण त्या मोमोजचा स्वाद घरच्या घरी, अगदी ताज्या भाज्यांसह, हॉटेलसारखा आणि आरोग्यदायी पद्धतीने मिळाला, तर? गाजर, कोबी, शिमला मिरची यासारख्या पौष्टिक भाज्यांनी भरलेले आणि लसूण-आल्याच्या झणझणीत चवीनं सज्ज हे व्हेजिटेबल मोमोज आता तुम्हीही सहज घरी बनवू शकता.

चला तर मग, गरमागरम चटणीसह खमंग मोमोज तयार करण्याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

कव्हरसाठी

  • दीड कप मैदा

  • चवीनुसार मीठ

  • 1 चमचा तेल

सारण

  • 1 चमचा तेल

  • 1/2 कप कोबी, 1/2 कप गाजर, भोपळी मिरची, 4-5 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरवी मिरची सगळ्या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यावे.

  • 1/2 चमचा मिरेपूड

  • 1 चमचा सोया सॉस

  • चवीपुरते मीठ

कृती

कव्हर बनवून घ्यावे. त्यासाठी मैदा, मीठ, तेल एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे. झाकण ठेवून 10-15 मिनिटे ठेवावे.

सारण बनविण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण, आले आणि मिरची परतून घ्यावी. सर्व भाज्या एकत्र घालाव्यात. मोठ्या आचेवर- 10मिनिटे परताव्यात. त्यात मीठ, मिरेपूड आणि सोया सॉस घालावा. तयार सारण एका भांड्यात काढून घ्यावे.

भिजवलेल्या मैद्याचे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. मध्यभागी 2-2 चमचे सारण ठेवावे. एक कड हातात घेऊन मध्यभागी आणावी. छोट्या-छोट्या चुण्या करून पहिल्या चुणीच्या मागे चिकटवाव्यात. अशाप्रकारे गोल पूर्ण करावा. तसेच करंजीच्या आकारातही मोमोज बनवता येतात. तयार झालेले मोमोज पिळून घेतलेल्या ओल्या कपड्याखाली ठेवावेत. सर्व मोमोज बनवून घ्यावेत.

इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून 10-15 मिनिटे वाफवून घ्यावे. 15 मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.

गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

टीप

  • मोमोज उकडण्याऐवजी तळू शकतो.

  • सारणामध्ये पनीर, टोफू किंवा नॉन-व्हेजिटेरियन्ससाठी चिकनचे छोटे पिसेस घालू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT