Rice sakal
फूड

Tamarind Rice: काहीतरी लाइट आणि झटपट बनवायचंय? मग साऊथ इंडियन स्टाईल चिंचेचा भात नक्की ट्राय करा

साऊथ इंडियन लोकं पुलिहोरा किंवा पुलियोधरा असं म्हणतात.

Aishwarya Musale

दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये, जर तुम्हाला फक्त इडली, डोसा बद्दल माहिती असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तसे नाही कारण चिंचेपासून बनवलेला भात देखील दक्षिण भारतात खूप खाल्ला जातो. होय, तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की चिंचेचा भात रायता आणि पापड सोबत दिला जातो. चिंचेच्या भाताला साऊथ इंडियन लोकं पुलिहोरा किंवा पुलियोधरा असं म्हणतात, 'पुली' म्हणजे काहीतरी आंबट.

ऑफिसला जाणार्‍या लोकांची ही सर्वात आवडती डिश आहे कारण त्यांना भरपूर खाद्यपदार्थ बनवायला वेळ मिळत नाही. तुम्हालाही आंबट जेवण आवडत असेल तर चिंचेचा भात तुमच्यासाठी योग्य आहे. चिंचेचा भात तुम्ही घरी सहज कसा बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

चिंचेच्या भाताची रेसिपी

साहित्य:

  • सव्वा वाटी तांदूळ

  • पाउण वाटी चिंचेचा कोळ

  • ३-४ हीरव्या मिरच्या

  • २ लाल सुक्या मिरच्या

  • २ टिस्पून लाल तिखट

  • १ टिस्पून उडीद डाळ

  • टिस्पून हरभरा डाळ

  • पाव वाटी शेंगदाणे

  • फोडणीसाठी: २ चमचे तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे,१/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद, ३-४ कढीपत्त्याची पाने

  • मीठ

कृती:

  • सर्वात आधी सव्वा वाटी तांदूळाचा भात शिजवून घ्या आणि तो भात थंड होवू द्या.

  • भात थंड झाला की त्याला चवीपुरते मिठ आणि लाल तिखट लावून मिक्स करा.

  • कढईत तेल गरम करा, आणि त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद कढीपत्ता घाला. लाल मिरच्यांचे तुकडे घाला. सांडगी मिरच्या घालून ढवळा.

  • शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ घालून परतवून घ्या. उडीद डाळ गोल्डन ब्राउन झाली की चिंचेचा कोळ घाला.

  • १५-२० सेकंदाने भात घालून ढवळावे.

  • आता तुमचा गरमागरम भात तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT