Healthy Breakfast esakal
फूड

Healthy Breakfast : नाश्त्यासाठी बनवा झटपट होणारा मसालेदार फ्रेंच टोस्ट, ‘ही’ आहे सोपी रेसिपी

ही हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी तुम्ही १० मिनिटांमध्ये करू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast : निरोगी जीवनशैलीसाठी रोज सकाळचा नाश्ता करणे अतिशय महत्वाचे आहे. अनेकदा सकाळच्या गडबडीमध्ये काही जणांकडून नाश्ता करायचे राहून जाते. परंतु, असे काही करू नका. रिकाम्या पोटी कधीच घराबाहेर पडू नका. तुम्ही कोणताही झटपट नाश्ता करा पण तो करूनच घराबाहेर पडा. मात्र, नाश्ता हेल्दी असणे अतिशय महत्वाचे आहे.

अनेकांना रोजच्या गडबडीमुळे सकाळी नाश्ता करणे शक्य होत नाही. तसेच, रोज एकच प्रकारचा नाश्ता खाल्ल्याने अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे, आज आम्ही तुमच्यासाठी खास एक रेसिपी घेऊन आलो आहोत. ही ब्रेकफास्ट रेसिपी तुम्ही १० मिनिटांमध्ये करू शकता. या रेसिपीचे नाव आहे मसालेदार फ्रेंच टोस्ट. चला तर मग जाणून घेऊयात ही हेल्दी रेसिपी.

मसालेदार फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • ४ ब्रेड स्लाईस

  • २ अंडी

  • १ कांदा

  • १ टोमॅटो

  • अर्धा चमचा मीठ

  • ४ चमचे दूध

  • ४-५ हिरव्या मिरच्या

  • तेल किंवा बटर

  • १ चमचा तिखट

मसालेदार फ्रेंच टोस्ट बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे :

  • जर तुम्ही झटपट होणारे आणि हेल्दी नाश्त्याचे पर्याय शोधत असाल तर मसालेदार फ्रेंच टोस्ट एक उत्तम पर्याय आहे.

  • हा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.

  • आता ब्रेडचे दोन भाग करून घ्या.

  • त्यानंतर, २ अंडी एका भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये फोडून टाका. आता या अंड्यामध्ये तिखट, मीठ आणि दूध घालून ते चांगल्या प्रकारे फेटून घ्या.

  • दुसऱ्या बाजूला पॅन गरम करायला ठेवा. त्यामध्ये बटर किंवा तेल घाला.

  • आता दोन्ही ब्रेडचे स्लाईस अंड्याच्या मिश्रणात बुडवून ते बेक करण्यासाठी तव्यावर किंवा पॅनवर ठेवा.

  • आता दोन्ही बाजूंनी ब्रेड चांगला शिजवून घ्या. तुमचा मसालेदार फ्रेंच टोस्ट तयार आहे. आता हा टोस्ट, थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्या.

  • बाकीचे फ्रेंच टोस्ट याच पद्धतीने बनवून घ्या आणि टोमॅटो केचअप किंवा पुदिना चटणीसोबत गरमागरम फ्रेंच टोस्ट सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT