Sweet Recipe esakal
फूड

Sweet Recipe: रोज तेच ते खाऊन कंटाळलात? ट्राय करा ही मखान्याची टेस्टी अन् हेल्दी रेसिपी

ही कमी वेळात तयार होणारी रेसिपी एकदा वाचाच

सकाळ डिजिटल टीम

Navratri Special: नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेकजण उपवास करतात. आता उपवासात काही जण फक्त गोड खातात तर काही जण मिठाचंही खाणं पसंत करतात. तुम्हाला जर हटके स्वीट रेसिपी ट्राय करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी बेस्ट आहे. नवरात्रीच्या दिवसांत उपवासाला तुम्ही मखाना आणि मेव्याची मिठाई खाऊ शकता.

मिठाईसाठी लागणारी सामग्री

दूध

साखर

नारळ

मखाणे

काजू

विलायची

बदाम

मखान्याची बर्फी अशी बनवा

मखान्याला हलक्या गरम कढईत थोड्या वेळ परता. हाताने मखान्याला तोडून बघा. पापडासारखा मखाना तोडल्या जात असेल तर गॅस बंद करा.

गरम मखन्याला ग्राइंडर मध्ये टाकून बारीक करून घ्या. बारीक मखान्याचा चुरा चाळणीने गाळून घ्या. आणि जाड पुड वेगळी करून घ्या.

यानंतर अर्धा कप काजू बारीक करून घ्या.

आता नारळ पावडर कढईमध्ये गरम करण्यास ठेवा. २-३ मिनिटांच्या वर त्याला गरम करू नका.

कढईत दूध गरम करत दूधाला गाढं करा. त्याची अर्धी मात्रा होतपर्यंत त्याला तापवा. त्यानंतर त्यात चवीनुसार साखर घाला.

आता गॅसची फ्लेम कमी करा. यानंतर त्यात विलायची पावडर, नारळ पावडर, कुटलेले काजू आणि बारीक केलेला मखाना टाका. या पावडरला चांगलं मिक्स करून घ्या.

एका पातेल्याला तूप लावून हे मिश्रण त्यात घाला. हे मिश्रण थंड झालं की बदामचे तुकडे टाकून त्याला सजवून घ्या. एक दोन तासांनी त्याचे छोटे छोटे काप करून घ्या.

तुमची मखाना बर्फी रेडी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT