ice cream rolls with maggi 
फूड

कसं खायचं! मॅगी आईस्क्रीम रोल पाहताच नेटकरी वैतागले

गेल्या काही दिवसांपासून चित्रविचित्र पदार्थ करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून चित्रविचित्र पदार्थ करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. चित्र-विचित्र आईस्क्रीम (Icecream)रोल्स केलेले व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यात आता मॅगी आईस्क्रीम रोलची भर पडली आहे. मॅगी आपल्या सर्वांना आवडते. दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी दिवसाच्या कुठल्याही वेळी आपण खाऊ शकतो. तेच आईस्क्रीम बाबतही. आईस्क्रीमही सर्वांना आवडतंच. पण हे दोन्ही मिळून आईस्क्रीम खाणं म्हणजे! एका खाद्य पदार्थ विक्रेत्यानेही असाच एक प्रयोग केला आहे.. त्याने मॅगी आईस्क्रिम रोल बनवला आहे. पाणीपुरी आईस्क्रीम, ढोकळा आईस्क्रीम, मसाला डोसा आईस्क्रीम नंतर आता या पदार्थामुळे लोक वैतागले आहेत. (Weird Food Viral Video)

हा अतरंगी व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या thegreatindianfoodie या पेजवर शेअर करण्यात आला असून आहे. Ye maggi ke shaktiyo ka galat istemal ho ra hai maa अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. हे आईस्क्रीम करणाऱ्या व्यक्तीने मॅगी एका कोल्ड पॅनवर घेतली आहे. या मॅगीवर तो क्रिम, आईस्क्रिम टाकतो. क्रिम टाकल्यानंतर तो हे मिश्रण चांगल्याप्रकारे कुटून, दाबून एकजीव करतो आहे. त्यानंतर एकत्र झालेलं हे मिश्रण पसरवून त्याचे लहान लहान मॅगी आईस्क्रिम रोल बनवतो. हे रोल एका डिशमध्ये ठेवल्यानंतर तो त्यावर चॉकलेट सॉस, स्प्रिंकल्स टाकतो. हा मॅगी आईस्क्रिम रोल सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालतो आहे. (Weird Food Viral Video)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT