in marathi easy recipe of tawa paratha 
फूड

रेस्टॉरंटसारखी घरी बनवा झटपट तवा पराठा रेसिपी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनेकांना काही डिश पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटते. त्यातीलच काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे झटपट तवा पराठा. जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही झटपट पराठा तयार करू शकता.

तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसेच हेल्दी रेसिपीचा ऑप्शन शोधत असाल तर तवा पराठा बनवण्याची ही रेसिपी खूप सोपी आहे. जे चिली फलेक्स आणि मटारपासून तयार केली जाते. परंतु हे पराठे बनवण्यासाठी तव्याचा वापर केला नसून ते कढईमध्ये फ्राय केले आहे.

साहित्य  

400 ग्रॅम आटा
2 टेबल स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून मीठ

स्टफिंग करण्यासाठी 

तेल किंवा तूप 
1 टेबल स्पून तूप
1 टी स्पून जिरे 
1 कप हिरवे मटार 
चवीनुसार मीठ 
लाल मिरची पावडर

कृती : सुरवातीला पिठ घेऊन त्यात चिली फलेक्स, मीठ आणि पाणी घालून कणिक तयार करा. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल किंवा तूप घाला. त्यानंतर जिरे टाकून त्यात हिरवे मटार, चवीपुरते मीठ आणि लाल मिरची टाका. हिरवे मटार शिजवून घेऊन हे सर्व मॅश करून घ्या. त्यानंतर तुमचे स्टफिंग तयार होईल. आता एक कणकेचा गोळा घ्या, त्यात स्टफिंग केलेलं भरून गोळा तयार करा. तयार गोळा हलक्या हाताने लाटून घ्या. आणि गरमागरम तवा पराठा सर्व्ह करा. 

टीप : याशिवाय आपण दुसरे ही पराठे ट्राय करू शकता. तयार तवा पराठ्यासोबत तुम्ही दही किंवा लोणचे खाऊ शकता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT