how to make green chilli pickle Recipe 
फूड

Instant Pickle Recipe: असं बनवा हिरव्या मिरचीचं झटपट लोणचं

Green Chilli Pickle Recipe: प्रत्येक भागात एवढचं नव्हे तर प्रत्येत घरात लोणचं Pickle तयार करण्याची पद्धत ही खास आणि निराळी असते. लोणचं कैरीचं असो, लिंबाचं किंवा मिरचीचं Chille ताटात लोणचं असलं की जेवणाची Meal चव आणखी वाढते

Kirti Wadkar

Green Chilli Pickle Recipe: ताटातल्या स्वादिष्ट भोजनाची चव आणखी वाढते ती म्हणजे जेव्हा तोंडी लावण्यासाठी सोबत लोणचं असतं. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची घराघरांमध्ये तयार केली जातात. Marathi Food Tips Make Chille Pickle at Home

प्रत्येक भागात एवढचं नव्हे तर प्रत्येत घरात लोणचं Pickle तयार करण्याची पद्धत ही खास आणि निराळी असते. लोणचं कैरीचं असो, लिंबाचं किंवा मिरचीचं Chilli ताटात लोणचं असलं की जेवणाची Meal चव आणखी वाढते. 

वर्ष भरासाठी लोणचं तयारं करणं म्हणजे तसं सोप काम नाही. यासाठी सर्व साहित्य योग्य प्रमाणात वापरून ते चांगलं मुरणं गरजेचं असतं. चांगलं मुरलेलं लोणचं चवीला Taste तर रुचकर लागतच शिवाय ते वर्षभर टिकतं ही.

मात्र जर तुम्हाला काही दिवस टिकेल असं मिरचीच झटपट लोणचं  तयार करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. green chilli instant pickle, 

झटपट इन्स्टंट मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे मिरच्यांची निवड करू शकता. यासाठी तुम्ही छोट्या तिखट लवंगी मिरच्याही वापरू शकता किंवा मोठ्या मिरच्याही वापरू शकता. मात्र जर साधारण मध्यम तिखट मिरचीचं लोणचं चवीला उत्तम लागतं. 

हे देखिल वाचा-

झटपट मिरची लोणचं तयार करण्यासाठी साहित्य

- हे लोणचं तयार करण्यासाठी तुम्हाला मुख्यत्वे १०० ग्रॅम मिरच्या, मोहरीचं तेल अर्धी वाटी, विनेगर ३-४ चमचे, ३ चमचे बडीसोप, काळी मोहरी २ चमचे, १ चमचा मेथी दाणे, १ चमचा जीरं, १ लहान चमचा हळद,  पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि १ लहान चमचा गुळ

झटपट मिरची लोणचं तयार करण्याची कृती

झटपट मिरची लोणचं तयार करण्यासाठी सर्वप्रमथ मिरच्या स्वच्छ धुवून घ्याव्या. त्यानंतर त्या कापडाने चांगल्या कोरड्या कराव्या. 

- या मिरच्यांचे बारिक तुकडे करावे. हवं असल्यास तुम्ही मिरची मधून चिरून तिचे दोन भाग करु शकता. 

- त्यानंतर मसाला तयार करण्यासाठी पॅन किंवा कढईमध्ये बडीशेप, काळी मोहरी, मेथीचे दाणे, जीरं मंद आचेवर अगदी १-२ मिनिटं भाजून घ्यावं. हे साहित्य जास्त भाजू नये. त्यानंतर मिक्सरमध्ये याची भरड पावडर तयार करावी. 

- आता एका बाउलमध्ये चिरलेल्या मिरच्या घ्याव्या. यात तयार केलेली मसाल्यांची भरड पावडर टाकावी. त्यानंतर हळद, मीठ, हिंग आणि किसलेला गुळ टाकावा. 

- या मिश्रणात आता ४ चमचे विनेगर टाकावं.

- त्यानंतर ४-५ चमचे मोहरीचं तेल हलकं कोमट करून ते वरून टाकावं. सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. 

अशा प्रकारे तुमचं झटपट मिरचीचं लोणचं तयार होईल. हे लोणचं तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता. तसचं खाण्यासाठी देखील तुम्ही ते त्वरित ताटात वाढू शकता. 

काचेच्या बरणीतील मिरचीच हे लोणचं तुम्ही फ्रिजमध्ये जवळपास महिना ते दीड महिन्यासाठी ठेऊ शकता. 

तिखट, आंबट चवीचं हे लोणचं तुम्ही केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर कधीही तयार करू शकता. 

how to make green chilli pickle

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT