Kuttu flour recipes in Marathi  Esakal
फूड

Shravan 2023 Healthy Recipes: पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी कुट्टूचं पीठ फायदेशीर, श्रावणात उपवासासाठी करा कुट्टूच्या पीठाच्या विविध रेसिपी

इंग्रजीमध्ये या पिठाला बकव्हिट असं म्हणतात. या कुट्टूच्या पिठात अनेक पोषक गुणधर्म असून ते शरीरासाठी लाभदायक असतात

Kirti Wadkar

एपावसाळ्याच्या काळामध्ये पचनक्रिया मंदावते. या काळामध्ये पोटाच्या समस्या निर्माण होण्याच्या शक्यता अधिक असता. त्यामुळे पचनास हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय या काळामध्ये पालेभाज्या किंवा दूधाचं सेवनही करावं. Marathi Health Tips for Shravan use of Kuttu Floor for Healthy Diet

अशामध्ये तुम्ही पावसाळ्यात Monsoon आणि खास करून श्रावणामध्ये Shravan तुमच्या आहारामध्ये कुट्टुच्या पिठाचा समावेश करू शकता. कुट्टूही हे एक अत्यंतं जुनं धान्य असून या धान्याच्या पठापासून विविध पदार्थ तयार केले जातात.

इंग्रजीमध्ये या पिठाला बकव्हिट असं म्हणतात. या कुट्टूच्या पिठात अनेक पोषक गुणधर्म असून ते शरीरासाठी लाभदायक असतात. पावसाळ्यामध्ये मोटाबोल्जिम कमी असल्याने कुट्टूच्या पिठाच्या पदार्थाचा आहारात समावेश करता येईल.

कारण हे पीठ पचनास हलकं असतं. या पीठापासून बनवण्यात आलेल्या पदार्थाच्या सेवनाने अनेक आजार दूर होवू शकतात. विशेष म्हणजे कट्टूच्या पिठाचे पदार्थ तुम्ही उपवासासाठी खावू शकता. या पिठापासून उपवासाचे पराठे, थालिपीठ, धिरडं तसंच पकोडे तयार करता येतात.

तेव्हा जाणून घेऊयात कुट्टूच्या पठाचे आरोग्यासाठी फायदे.

कुट्टूच्या पिठामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, विटामिन्स आणि फायबर उपलब्ध असतं. तसंच यात मॅग्नेशियम, झिंक, आयरन आणि विटामिन बी देखील मुबलक प्रमाणात आढळतं.

यामुळे कुट्टूच्या पिठाचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरत. शिवाय यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ रुचकर देखील लागतात.

हे देखिल वाचा-

कुट्टूच्या पिठामध्ये क्वेरसेटिन आणि फ्लेवोनॉइड्ल ही गुणधर्म आढळतात. ज्यामुळे इंफ्लेमेशनची समस्या दूर होते.

मधुमेही रुग्णांना कुट्टू पिठापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचं सेवन लाभदायक ठरतं. कुट्टूच्या पिठातील प्रोटीन, फायबर आणि फ्लेनोनॉइड्समुळे रक्तातील ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ग्लूटनची एॅलर्जी असलेल्यांना कुट्टूच्या पीठाचे पदार्थ हा एक चांगला पर्याय आहे. कराण हे पीठ ग्लूटन फ्री असतं. तसंच याच्या सेवनामुळे पचनक्रिया मजबुत होण्यास मदत होते.

कुट्टूच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.

कुट्टूच्या पिठाच्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश केल्यास बद्धकटकोष्ठतेचा त्रास दूर होतो. यातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

कुट्टूमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम ही गुणधर्म असल्याने दातांचं आणि हाडांच आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तसंच हाडं मजबूत होतात.

अशा प्रकारे कुट्टीच्या पिठाचे आरोग्यासाठी फायदे करून घेण्यासाठी तुम्ही उपवासाव्यतिरिक्त इतर वेळी देखील कुट्टुच्या पिठाच्या पदार्थांचा आहारामध्ये सामावेश करू शकता.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT