Methi Thepla Recipe:  Sakal
फूड

Methi Thepla Recipe: सकाळच्या नाश्त्यात घ्या गुजराती मेथी थेपल्याचा आस्वाद

Methi Thepla Recipe: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न पडला असेल तर मेथीपासून स्वादिष्ट थेपला बनवू शकता.

Puja Bonkile

Methi Thepla Recipe morning breakfast gujarati dishes

सकाळच्या नाश्त्यात उपमा, पोहे,पराठा खाण्याचा कंटाळा आला असेल तर मेथी थेपला नक्की ट्राय करू शकता. हा पदार्थ गुजरातची पारंपारिक डिश आहे. थेप्लामध्ये मेथी असते. यामुळे गा नाश्ता आणखी पौष्टिक बनतो. तुम्ही हा पदार्थ मुलांना टिफीनमध्ये देखील देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया मेथी थेपला कसा बनवावा.

  • मेथी थेपला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 कप गव्हाचे पीठ

2 वाटी मेथी

2 टीस्पून आलं आणि हिरवी मिरची पेस्ट

2 टीस्पून धने पावडर

1 टीस्पून साखर

1 टीस्पून दही

पाणी गरजेनुसार

तेल गरजेनुसार

मीठ चवीनुसार

  • कृती

मेथी थेपला बनवण्यासाठी सर्वात आधी मेथी स्वच्छ करून बारिक चिरावी. नंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्यावे. त्यात बारिक चिरलेली मेथी, लसूण आणि आलं पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट,ओवा, तिखट, हळद दही घालून मिक्स करावे. नंतर चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालून मळून घ्यावे. झाकण ठेऊन १० मिनिटं राहू द्यावे.

नंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवावे. पिठाचे छोटे गोळे करून पराठ्याच्या आकारात लाटून घ्यावे. तव्यावर थोडे तेल टाकून दोन्ही बाजून थेपले तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. तेलाएवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. चवीला चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता सर्व्ह करण्यासाठी गरमागरम मेथी थेपला तयार आहे. तुम्ही दही, लोणचं किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT