Momos Side Effect esakal
फूड

Momos Side Effect : मोमोज मोठ्या आवडीने खाता ना? डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती वाचून खाणे कायमचे कराल बंद

ट्विटरवर न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास कुमार यांनी मोमोजमुळे तुमचं आयुष्य कसं उध्वस्त होतं याची 5 वैज्ञानिक कारणे दिली आहेत

साक्षी राऊत

Momos Side Effect : मोमोज हे उत्तर भारतातील लोकांचे आवडते स्ट्रीट फूड आहे. काही लोकांना याचे तोटे माहिती असले तरी त्यांचे मोमोज खाणे काही थांबत नाही. असे काही रिपोर्ट्स देखील उघड झाले आहेत ज्यात मोमोजची चटणी जीवघेणी ठरली आहे. मोमोज सिल्व्हर (अॅल्युमिनियम) स्टीमर्समध्ये बनवले जातात, हे शरीरासाठी खूप हानिकारक ठरतात. आता ट्विटरवर न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास कुमार यांनी मोमोजमुळे तुमचं आयुष्य कसं उध्वस्त होतं याची 5 वैज्ञानिक कारणे दिली आहेत.

मोमोजचे पीठ तुमची हाडे आतून पोकळ करते

मोमोज पिठाचे बनलेले असतात. मैदा हे गव्हाचे उत्पादन आहे ज्यातून फक्त डेड स्टार्च सोडून प्रोटीन आणि फायबर काढले जातात. प्रोटीनरहीत पीठामुळे हे पीठ आम्लयुक्त बनते. हे पीठ शरीरात जाऊन हाडांचे कॅल्शियम शोषून घेते. मैदा नीट पचत नाही आणि कधीकधी आपल्या आतड्यांमध्ये चिकटतो आणि आपल्या आतड्यांमध्ये अडथळा आणू शकतो. यामुळे विविध आजार होऊ शकतात.

किडनी आणि पॅनक्रियाजचे नुकसान

तुमच्या लक्षात आले असेल की घरी बनवलेले मोमोज थोडेसे पिवळे असतात तर बाजारातील मोमोज पूर्णपणे पांढरे असतात. असे घडते कारण ब्लीच, क्लोरीन वायू, बेंझॉइल पेरोक्साइड, अझो कार्बामाइड ते पांढरे आणि मऊ बनवतात. या रसायनांमुळे किडनी आणि स्वादुपिंडाचे नुकसान होते आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो.

लाल चटणी आतड्यांना इजा करते

मोमोजसोबत दिलेली गरम लाल मिरचीची चटणी उत्तेजक असते, त्याची गुणवत्ताही कमी असते, ज्यामुळे मूळव्याध, जठराची सूज, पोट आणि आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. (Food)

MSG अत्यंत धोकादायक आहे

काही मोमोज विक्रेते मोमोसमध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) नावाच्या रसायनाचा वापर करतात. यामुळे त्याची चव वाढते आणि ते सुगंधी बनते. या एमएसजीमुळे लठ्ठपणा वाढतो. मेंदू आणि मज्जातंतूंच्या समस्या, छातीत दुखणे, हृदय गती वाढणे, बीपी अशा तक्रारी निर्माण होतात. (Health)

मृत प्राण्यांचे मांस

काही ठिकाणी नॉनव्हेज मोमोजमध्ये मेलेल्या जनावरांचे मांस मिसळले जाते, तर सडलेल्या भाज्याही व्हेज मोमोजमध्ये मिसळल्या जातात. या भाज्यांमधून अनेक प्रकारचे कीटक आणि संसर्ग शरीरात पोहोचू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT