Monsoon Snacks:  Sakal
फूड

Monsoon Snacks: पावसाळ्यात हेल्दी अन् चटपटीत चाटचा आस्वाद घ्यायचाय? मग घरीच बनवा 'हे' 2 पदार्थ

Monsoon Snacks: पावसाळा सुरू झाला की विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जातो. पावसात चहा सोबत पकोडे, भजी अनेकांना आवडते. पण काहींना चटपटीत खावेसे वाटते. यंदा पावसाळ्या पुढील पदार्थ नक्की ट्राय करून पाहा.

Puja Bonkile

Monsoon Snacks: पावसाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये प्रत्येकाला चांगले पदार्थ खाण्याची इच्छा होते. यंदा पावसाळ्यात चटपटीत पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पुढील चटपटीत पदार्थ घरीच बनवून पावसाचा आनंद घेऊ शकता.

मोड आलेल्या मुगाची टिक्की

हा पदार्थ खायला खूप चविष्ट आहे. पावसाळ्यात चहाची मजा देखील दुप्पट होईल.

साहित्य

मोड आलेले मूग 2 वाट्या, हिरवा कांदा 1/2 कप बारीक चिरून, हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरून, लसूण 1 टीस्पून बारीक चिरून, चवीनुसार मीठ.

कृती

मोड आलेले मूग मिक्सरमध्ये टाकून बारीक करावे. नंतर एका भांड्यात हिरवा कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून मिक्स करावे. त्याचे छोटे गोळे करून सपाट करा. आता तवा गरम करून त्यावर थोडे तेल टाका आणि मग या टिक्की भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा. पुदिना आणि टोमॅटो चटणीसोबत सर्व्ह करा.

पनीर बॉल

साहित्य

250 ग्रॅम किसलेले पनीर, 2 चमचे कॉर्न फ्लोअर, चवीनुसार मीठ, 1 कप उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप ब्रेड क्रंब्स, 2 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून मिरची पेस्ट.

कृती

एका भांड्यात किसलेले पनीर, कॉर्न फ्लोअर, उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, हिरव्या मिरचीची पेस्ट, लसूण पेस्ट, मीठ, ब्रेड क्रंब आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे. मिश्रणाचे गोळे बनवा. कढईत तेल टाकून गरम करा. सर्व गोळे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. प्लेटमध्ये काढून चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली पोलीस अडचणीत येणार, सर्वोच्च न्यायलयात अवमान याचिका दाखल! त्याचं एक चुकीचं पाऊल अन्...

IND vs NZ: भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचे प्राधान्य, कारणही आलं समोर

CJP Protest: पुण्यातील CJP आंदोलकांचा मास्टर प्लॅन! पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आर्टिकल २२६ चा वापर; आता हायकोर्टाचे पोलिसांना थेट आदेश!

HDFC Bank CEO Salary: नव्या CEO ना मिळणार इतका पगार की RBI गव्हर्नरचं वेतनही वाटेल कमी! किती आहे संपूर्ण पॅकेज?

Marathi News Live Updates : सोलापुरात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयोजकाविरोधात गुन्हा दाखल, शिलाई मशीन आणि अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम भोवला

SCROLL FOR NEXT