Moong Dal Cheela Recipe esakal
फूड

Moong Dal Cheela Recipe : नाश्त्याला बनवा पौष्टिक मूग डाळीचा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

Moong Dal Cheela Recipe : जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याची सुरूवात ही हेल्दी करायची असेल तर त्यासाठी मूग डाळीचा चिला हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Moong Dal Cheela Recipe : जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याची सुरूवात ही हेल्दी करायची असेल तर त्यासाठी मूग डाळीचा चिला हा सर्वोत्तम पर्याय आहे. मूग डाळ ही पौष्टिकतेने परिपूर्ण असते आणि त्यापासून बनवलेला चिला हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. इतकच नव्हे तर मूग डाळ चवीला उत्तम लागते. त्यामुळे, त्यापासून बनवलेला हा चिला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने खातात.

मूग डाळ आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करते. जर तुम्हाला मूग डाळीपासून चिला बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात मूग डाळीचा चिला कसा बनवायचे ते?

मूग डाळीचा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ वाटी मूग डाळ

  • बेसन २ वाट्या

  • १ बारीक चिरलेला कांदा

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • लाल तिखट १ चमचा

  • चिमूटभर हळद

  • तेल आवश्यकतेनुसार

  • चवीनुसार मीठ

मूग डाळीचा चिला बनवण्याची पद्धत :

  • मूग डाळीचा चिला बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात किंवा बाऊलमध्ये मूग डाळ १-२ तासांसाठी भिजत घाला. तुम्हाला रात्रभर ही डाळ भिजत घालायची असेल तरी चालेल.

  • त्यानंतर, मिक्सरच्या भांड्यात ही मूग डाळ घाला. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. हे मिश्रण चांगले बारीक करा.

  • आता या मिश्रणात बेसनाचे पीठ घालून चांगले मिसळून घ्या. त्यानंतर त्यात इतर साहित्य घालून मिसळा.

  • जर हे मिश्रण घट्ट झाले असेल तर त्यात थोड पाणी मिसळा आणि तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला.

  • आता तुमचे मूग डाळीचे बॅटर तयार आहे.

  • गॅसवर एक पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा.

  • या तव्यावर थोडस तेल पसरून घ्या आणि पळीच्या मदतीने मूग डाळीचे मिश्रण तव्यावर पसरवा.

  • हे मिश्रण गोलाकार पसरवून चिला तयार करून घ्या.

  • आता हा चिला दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • आता हा चिला एका प्लेटमध्ये काढून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हा गरमागरम चिला सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

पाय घसरला आणि.., पडता पडता थोडक्यात वाचली जेनिलिया, सोशल मीडियावर Viral Video

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

SCROLL FOR NEXT