Roti Samosa Sakal
फूड

Morning Breakfast Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसा, जाणून घ्या रेसिपी

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात उरलेल्या चपातीपासून चवदार समोसा तयार करू शकता.

Puja Bonkile

Roti Samosa: अनेक लोक रात्री उरलेल्या चपातीपासून चिवडा बनवतात. पण चपातीचा चिवडा खाऊन बोर झाले असाल तर समोसा बनवू शकता. सकाळी चहासोबत चवदार समोसा बनवू शकता. चपाती समोसा बनवणे सोपे असून चवदार देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया समोसा कसा बनवाव.

समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

चपाती

उकडलेला बटाट

बेसण

हिरवी मिरची

लाल तिखट

गरम मसाला

कोथिंबीर

तेल गरजेनुसार

मीठ चवीनुसार

कृती

रोटी समोसा बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकळवून थंड करावे. नंतर ते सोलून चांगले मॅश करावे. यानंतर कढईत तेल टाका. त्यात जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घ्या. यानंतर, मॅश केलेले बटाटे पॅनमध्ये टाका.

यानंतर, सर्व मसाले आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. ते तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर टाका. आता ते बाजूला ठेवा आणि थंड करा.

समोसे चिकटवण्यासाठी बेसनाचे जाडसर पीठ तयार करा. यानंतर चपाती मधोमध कापून घ्या. आता एक तुकडा घ्या, एक त्रिकोण बनवा आणि त्यात बटाट्याचे सारण भरावे. शेवटी, समोसा बनवा आणि बेसन पिठाच्या मदतीने चिकटवा. आता कढईत तेल गरम करून त्यात रोटी समोसा टाकून तळून घ्या. गरमागरम चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT