Masala Dosa Bites: Sakal
फूड

Masala Dosa Bites: सकाळी नाश्त्यात करून पाहा मसाला डोसा बाईट्स, जाणून घ्या रेसिपी

Masala Dosa Bites: सकाळी नाश्त्यात काही चवदार आणि झटपट तयार होणारा पदार्थ खायची ईच्छा असेल तर मसाला डोसा बाईट्स बनवू शकता.

Puja Bonkile

Masala Dosa Bites: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सकाळच्या धावपळीच चवदार पदार्थ बनवायचा असेल तर मसाला डोसा बाईट्स बनवू शकता. हा पदार्थ बनवायाल सोपा आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घेऊया हा पादर्थ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कोणती आहे.

मसाला डोसा बाईट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तेल - 1 टीस्पून

मोहरी - 1 टीस्पून

हिंग - चिमूटभर

टोमॅटो - 2 चमचे

हिरव्या मिरच्या - 1 टीस्पून

आल्याची पेस्ट - 1 टीस्पून

उकडलेले बटाटे - 1 कप

साखर - 1 टीस्पून

लिंबाचा रस - 1 टीस्पून

कोथिंबीर -सजावटीसाठी

मीठ- चवीनुसार

बटर

मसाला डोसा बाईट्स बनवण्याची कृती

सर्वात आधी एका कढईमध्ये तेल गरम करावे. नंतर त्यात मोहरी,जीरं, बारिक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, बारिक चिरलेला कांदा, आलं आणि लसूण पेस्ट टाकून चांगले शिजू द्यावे. नंतर त्यात उकलेला बटाटा टाकावा आणि चांगले मिक्स करावे. नंतर लिंबाचा रस,साखर आणि कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करा. नंतर थंड करायला ठेवा.

दुसरीकडे अप्पे पात्र गरम करावे. त्यात पहिले डोशाचे पीठ टाकावे नंतर त्यात बटाट्याचे लहान गोळे करून टाकावे. परत डोशाचे पीठ वरून टाकावे. चांगले शिजू द्यावे. नंतर तयार अप्पे काढून घ्यावे. हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT