Weigh Loss Breakfast sakal
फूड

Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये बनवा सोया पोहे, होतील अनेक फायदे !

वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे.

Aishwarya Musale

ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे, त्यांनी व्यायाम, योगासने याशिवाय त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. चांगला आणि सकस आहार लवकर वजन कमी करण्यास मदत करतो. 

पोह्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन्स, फायबर, कार्ब्ज आणि व्हिटॅमिन असतात. पोहे पचायला हलके असतात म्हणून लोकं नाश्त्याला पोहे बनवणं पसंत करतात. पण तुम्ही सोया पोहे खाल्लेत कधी? जाणून घ्या रेसिपी.

साहित्य

सोया चंक्स १ कप, भिजवलेले पोहे दीड कप, मिरच्या २, शेंगदाणे, मोहरी, कढीपत्ता, अर्धा बारीक चिरलेला कांदा, हळद, लिंबाचा रस १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ

कृती

  • दोन कप गरम पाण्यात सोया चंक्स टाका. १५ मिनीटं भिजू द्या.

  • नंतर पाणी काढून एका भांड्यांत ठेवा.

  • मग एका कढईत तेल गरम होऊ द्या.

  • त्यात कांदा, मिरची, कढीपत्ता टाका.

  • हे सर्व ३-४ मिनीटं शिजू द्या.

  • यात शेंगदाणे घालून नीट परता.

  • नंतर त्यात सोया चंक्स आणि मीठ टाकून नीट मिक्स करा.

  • त्यात भिजवलेले पोहे घालून व्यवस्थित हलवून घ्या.

  • ५ मिनीटं वाफ घ्या. मग त्यात वरून लिंबू कोथिंबीर घाला.

  • पौष्टीक सोया पोहे तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT