Crispy Corn Cutlet Recipe: Sakal
फूड

Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा क्रिस्पी कॉर्न कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

Crispy Corn Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खायचा असेल तर क्रिस्पी कॉर्न कटलेट बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे.

Puja Bonkile

Crispy Corn Cutlet Recipe: पावसाळ्यात भाजलेले मक्याचे कणिस खाण्याची मज्जाच वेगळी असते. मक्याच्या दाण्यापासून भेळ, चाट पदार्थ तुम्ही खाल्ले असेलच पण क्रिस्पी कॉर्न कटलेट ट्राय केले आहे का?नसेल तर नाश्त्यात नक्की ट्राय करून पहा. हा पदार्थ बनवणे अगदी सोपे असून चवदार आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खुप आवडेल. तसेच मक्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी कॉर्न कटलेट कसे बनवतात.

क्रिस्पी कॉर्न कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मक्याचा चुरा - १/२ कप

गाजर - २ टेबल स्पून

सिमला मिरची- 1 टेबल स्पून

उकडलेल्या मक्याचे दाणे -१/४ कप

उकडलेले बटाटे- १

हिरवी मिरची - २ टेबल स्पून

आलं पेस्ट- २ टेबल स्पून

कोथिंबीर- २ टेबल स्पून

लाल तिखट - १ टेबल स्पुन

हळद - १ टेबल स्पुन

गरम मसाला- १ टेबल स्पुन

मीठ- चवीनुसार - १ टेबल स्पुन

बेसण- १ टेबल स्पून

तांदळाचे पीठ- २ टेबल स्पून

रवा-१/२कप

चीज

क्रिस्पी कॉर्न कटलेट बनवण्याची कृती

क्रिस्पी कॉर्न कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी एका भाड्यांत मक्याचा चुरा घ्यावा. त्यात बारिक चिरलेली सिमला मिरची, गाजर, उकडलेल्या मक्याचे दाणे, बटाटा,हिरवी मिरची आणि आलं पेस्ट, कोथिंबिर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, बेसण, तांदळाचे पीठ सर्व चांगले मिक्स करावे. नंतर या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन कटलेट बनवावे. नंतर हे कटलेट रव्यामध्ये टाकावे आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. तयार क्रिस्पी कॉर्न कटलेटचा टोमॅटो सॉससोबत आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: राज्य सरकारकडून भरती रद्द, स्टेनोग्राफर पद मृत घोषित; पुण्यात विद्यार्थी आक्रमक

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! आता एक तोळा सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या ताजे भाव

परप्रांतीय ट्रेनमध्ये, कन्फर्म तिकिटासह मराठी माणूस प्लॅटफॉर्मवर; TC, रेल्वे प्रशासन, पोलीस अन् सरकार सगळेच झोपेत

Latest Marathi News Live Update: फरार निदा खान प्रकरणाला नवा ट्विस्ट; मेडिकल सर्टिफिकेटमुळे तपासावर प्रश्नचिन्ह

KKR च्या २५ कोटीच्या खेळाडूने का केली नाही बॉलिंग? अजिंक्य रहाणेने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाला, 'सामन्यावेळी त्याला....'

SCROLL FOR NEXT