Morning Breakfast esakal
फूड

Morning Breakfast : चण्याची ही रेसिपी पचायला हलकी अन् चवीलाही टेस्टी, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ब्रेकफास्ट

ही डिश फार टेस्टी असून तुम्हाला ती खाल्ल्यावर दीर्घकाळ भूक लागणार नाही.

साक्षी राऊत

Morning Breakfast : चणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमच्या आहारात चणे फार फायदेशीर ठरू शकते. बरेच लोक चणे भिजवून सॅलडमध्ये खातात. मात्र तुम्ही ब्रेकफास्टमध्ये एकाच पद्धतीचे चणे खाऊन कंटाळले असाल तर तुम्ही ही नवी रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी चणे उकळून बनवली जाते. उकळलेले चणे पचवण्यासाठी पचनसंस्थेला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. ही डिश फार टेस्टी असून तुम्हाला ती खाल्ल्यावर दीर्घकाळ भूक लागणार नाही.

रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पांढरे चणे/ काळे चणे

भाजलेले शेंगदाणे

कांदा

टोमॅटो

काकडी

कोथिंबीर

लिंबू

काळे मीठ

बारीक कापलेली हिरवी मिर्ची

चिली फ्लेक्स

मिक्स हर्ब्स

साधे मीठ

जीरे

छोले मसाला

शेव (Food)

बनवण्याची पद्धत

सगळ्यात आधी चणे ८ तासांसाठी भिजू घाला. मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी चणे बनवायचे असेल तर रात्रीच भिजू घाला. आता चण्याचे पाणी काढून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल घ्या. त्यात जिरे टाका. जिरे तेलाट तडकले की त्यात कांदा टाका. थोडे मीठ टाका. आता त्यात चणे टाकून फ्राय करून घ्या. त्यात थोडा छोले मसाला टाका. आता या चण्यांत बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, लिंबू, काळे मिठी, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, शेंगदाणे टाका. तुमचा हेल्दी मॉर्निंग ब्रेकफास्टे रेडी आहे. (Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT