Mango Sakal
फूड

पोषक-पूरक : फळांचा राजा आंबा

मधुर व रसयुक्त आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.

मृणाल तुळपुळे

मधुर व रसयुक्त आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. कच्चा आंबा म्हणजे कैरी ही हिरव्या रंगाची व आंबट चवीची असून, त्यापासून आंबट, गोड, तिखट अशा चवीचे लोणचे, चटण्या, मुरांबा, आमचूर असे प्रकार बनवले जातात. केशरी रंगाचा पिकलेला आंबा फोडी करून किंवा रस काढून खाल्ला जातो.

आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते; तसेच रक्तातील लालपेशी निर्माण करण्यास मदत होते. ए, सी व ई ही व्हिटॅमिन्स; पोटॅशियम, लोह व कॉपर ही खनिजे व इतर पोषणमूल्यांनी परिपूर्ण असा आंबा निरोगी हृदयासाठी उपयुक्त मानला जातो. त्याच्या सेवनामुळे त्वचेचा पोत व कांती सुधारण्यास मदत होते. बिटा कॅरोटिन, अल्फा कॅरोटिन असलेले हे फळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे.

आंब्यात तंतूमय पदार्थ भरपूर असतात; पण सोडियम आणि कोलेस्टेरॉल अजिबात नसते. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी आंब्याचे मिल्कशेक, आइस्क्रीम; तसेच थंडगार पन्ह्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. एका आंब्यात साधारणपणे ११० कॅलरीज व भरपूर शर्करा असते. त्यामुळे मधुमेही व स्थूल व्यक्तींनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आंबा खाणे योग्य ठरेल.

हापूस, पायरी, तोतापुरी, लंगडा असा कोणत्याही प्रकारचा आंबा कसाही खाल्ला, तरी त्याची चव लहान-मोठे सर्वांनाच आवडते. आंबा आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच. अशा या बहुगुणी आंब्याला त्याच्या गोडव्यामुळे आणि त्यातील आरोग्यदायी गुणधर्मांमुळे फळांचा राजा म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

SCROLL FOR NEXT