Sesame Sakal
फूड

पोषक-पूरक : बहुगुणी तीळ

पांढरे शुभ्र, छोटेसे आणि नाजूक तीळ दिसतात खूप छान. बाजारात पिवळट, लालसर रंगाचे, काळे असे तीळ मिळतात; पण स्वयंपाकघरात प्रामुख्याने पॉलिश केलेले पांढरे तीळ वापरले जातात.

मृणाल तुळपुळे

पांढरे शुभ्र, छोटेसे आणि नाजूक तीळ दिसतात खूप छान. बाजारात पिवळट, लालसर रंगाचे, काळे असे तीळ मिळतात; पण स्वयंपाकघरात प्रामुख्याने पॉलिश केलेले पांढरे तीळ वापरले जातात. तीळ हे म्यानमार, चीन, भारत व अनेक अफ्रिकी देशांत पिकत असून नायजेरिया, सुदान, इथिओपिया या देशांतील तर ते एक मुख्य पीक आहे.

तिळातील पोषक तत्त्वे, त्याचा स्वाद आणि कुरकुरीतपणामुळे अनेक खाद्यसंस्कृतीमधे त्याने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. बिस्किटे, ब्रेड, केक्स अशा बेकरी प्रॉडक्ट्समधे स्टरफाय केलेल्या पदार्थांत ते वापरले जातात. तिळाच्या वड्या, लाडू, चिक्की, तीळ घालून गुळाच्या पोळ्या असे अनेक पदार्थ बनवले जातात. याव्यतिरिक्त तिळाची वेगवेगळ्या प्रकारांनी चटणी बनवली जाते.

किंचित भाजून घेतलेले तीळ सॅलडमध्ये अथवा पदार्थ सजवण्यासाठी वापरतात. युरोपमध्ये मार्गारीन बनवताना त्यात तिळाचा वापर केला जातो. मध्यपूर्व देशातील पदार्थात तिळापासून बनवलेली पेस्ट म्हणजे ‘ताहिनी’ खूप वापरली जाते.

थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ खाल्ले जातात. या कारणामुळेच जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीला तिळगूळ बनवला जातो; तसेच बाजरीच्या भाकरीवर तीळ लावले जातात. तिळातील कॅल्शियम आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंक या घटकांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते; तसेच ते हाडांसाठी पोषक ठरतात. तिळातील पोषक तत्त्वामुळे तिळकूट वा तिळाच्या चटणीचा रोजच्या जेवणात सामावेश करावा..

तीळ ही तेल बी असल्यामुळे सहाजिकच त्यापासून तेल काढले जाते व अनेक देशांत ते स्वयंपाकासाठी वापरले जाते. हे तेल त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर असल्यामुळे तिळाच्या तेलाचा उपयोग शरीराला मसाज करण्यासाठी व दुखऱ्या सांध्यांवर चोळण्यासाठी केला जातो. काळे तीळ व तिळाचे तेल आयुर्वेदिक औषधात वापरते जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT