Mukhwas Recipe  Esakal
फूड

Mukhwas Recipe : खायला पौष्टिक आणि चवीला चवदार असा मुखवास कसा तयार करायचा?

अलिकडे अनेक लग्नकार्यामध्ये जेवण झाल्यानंतर मुखवास हा दिला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Mukhwas Recipe : अलिकडे अनेक लग्नकार्यामध्ये जेवण झाल्यानंतर मुखवास हा दिला जातो. विशेष म्हणजे या मुखवासातही विविध प्रकार असल्याचं पाहायला मिळतं. बडीशेप खाल्ल्यामुळे त्वचेसंबंधीत असलेल्या तक्रारी दूर होतात.

त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या असतील तर बडीशेपचं नियमित सेवन केल्यास या तक्रारी दूर होतील.रक्तशुद्धी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे बडीशेप.

बडीशेपमध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असता, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. आजच्या लेखात आपण खायला पौष्टिक आणि चवीला चवदार असा मुखवास घरच्या घरी कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

  1. एक पाव बडीशोप

  2. अर्धा वाटी ओवा

  3. अर्धा वाटी पांढरे तीळ

  4. अर्धा वाटी धना डाळ

  5. अर्धा वाटी जवस

  6. 2 ते 3 लिंबू

  7. मीठ

  8. हळद

कृती:

सर्वप्रथम बडीशोप,ओवा, जवस, तीळ यालालिंबू, मीठ आणि हळद घालून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.नंतर हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवावे. 15 मिनिटा नंतर लोखंडी कढई तापत ठेवावी आणि सुरूवातीला मंद आचेवर धना डाळ भाजुन घ्यावी धना दाळीला बदामी रंग आला की ताटात काढून घ्यावी.

नंतर मग कढईमध्ये तीळ, ओवा, जवस घालून मंद आचेवर कोरडे होई पर्यंत भाजून घ्या, व नंतर ताटात काढून घ्या. सगळ्यात शेवटी बडीशोप कढई मध्ये घालून घ्यावी. व ती मंद आचेवर कोरडी होई पर्यंत भाजून घ्यावी.

आता ताटात सगळे जिन्नस गार झाले की ते मिक्स करावे व नंतर एका कोरड्या बरणीत भरून ठेवा. बरणी शक्यतो हवा बंद हवी, म्हणजे मुखवास, मुखशुद्धी कुरकुरीत रहाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT