MULYACHI BHAJI RECIPE Esakal
फूड

MULYACHI BHAJI RECIPE: हिवाळ्यात मुळ्याची भाजी कशी तयार करायची?

हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते.

सकाळ डिजिटल टीम

Radish: हिवाळ्यात तुम्ही रोज मुळा खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.

मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. तुमच्या घरात जर मधुमेहाचा रुग्ण असेल तर त्याच्यासाठी मुळांचं सेवन करणं खूप चांगलं आहे. मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते. परंतु हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी मुळ्याचे सेवन करू नये. अशा परिस्थितीत एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजच्या लेखात आपण मुळ्याची चवदार भाजी कशी करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य :

चार ताजे लहान आकाराचे मुळे 

मुळ्याचा ताजा पाला 

 दोन मोठे कांदे 

अर्धा कप किसलेले ओले खोबरे

अर्धा कप भिजवलेली चणा डाळ  

हिरव्या मिरच्या बारीक चिरून

लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून

हळद

मीठ

तेल

कृती :

सर्वप्रथम मुळे आणि पाला बारीक चिरून घ्यावा. भाजी चिरल्यानंतर ती एका चाळणीत काढून घ्यावी जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल.

भाजीत पाणी राहिल्यास अति शिजून भाजीला उग्र दर्प येतो.कढईत तेल गरम करावे . तेल तापले कि त्यात लसूण मिरचीची फोडणी करावी.

लसूण गुलाबी रंगावर परतला गेला कि चिरलेला कांदा घालून चांगला पारदर्शक होईपर्यत मध्यम आचेवर परतावा.

चण्याची डाळ घालावी . मंद आचेवर कांद्यासोबत जरा परतून थोडे मीठ घालावे. झाकण घालून शिजू द्यावे.पाच मिनिटे आपण चण्याची डाळ शिजू दिली आहे , आता हळद घालून एक मिनिट परतून घेऊ.

चिरलेली भाजी घालून एकत्र मिसळून घेऊ. झाकण घालून पाणी अजिबात न घालता मंद आचेवर शिजू देऊ.बारा ते पंधरा मिनिटे भाजी शिजवून घेतली आहे .

मुळा आणि चण्याची डाळ चांगली शिजून नरम झाली आहे. आता चविनुसार मीठ घालून ढवळून घ्यावे.किसलेला ओला नारळ घालून भाजी छान एकत्र करून घ्यावी. नारळाची गोडसर चव भाजीत खूप छान लागते .

गॅसवरून उतरवून गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत वाढावी. भातात मिसळून खायला तर एकदम चविष्ट लागते. डब्यासाठी उत्तम !w

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT