Mushroom Recipe Esakal
फूड

Mushroom Recipe: घरच्या घरी बनवा, टेस्टी मटर मशरूम मसाला

मटर मशरूम मसाला हा एक असा पदार्थ की जो घरातील मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला जर रेस्टॉरंटसारखी मटर मशरूम मसालाची चव हवी असेल तर ही खास रेसिपी तुमच्याकरता मटर मशरूम मसाला हा एक असा पदार्थ की जो घरातील मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

बहुतेक लोक तर मटार आणि मशरूम खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जातात, परंतु हा पदार्थ घरी देखील सहज बनवता येतो. मटर मशरूम मसाला घराच्या घरी कसा तयार करायचा याचीच सविस्तर रेसिपी आज आपण या लेखात बघणार आहोत.

साहित्य:

● एक वाटी हिरवे वाटाणे

● एक पाव मशरूम

● तिन बारिक चिरलेले कांदे

● अर्धा वाटी काजू

● अर्धा वाटी दही

● तेल

● अर्धा चमचा गरम मसाला

● दोन तमालपत्र

● एक चमचा लसूण-आले पेस्ट

● एक चमचा लाल मिरची पावडर

● दोन चमचे धने पावडर

● चवीनुसार मीठ

● अर्धा चमचा जिरे पावडर

● थोडीशी कसुरी मेथी

कृती:

सर्व प्रथम एका पातेल्यात मध्यम आचेवर पाणी उकळून त्यात पाच मिनिटे मटार हलके शिजवून घ्यावे.नंतर पुन्हा दुसरे पाणी उकळून त्यात हळद, मीठ टाका आणि मशरूमचे तुकडे टाकावेत.


नंतर ग्रेव्हीची तयारी सुरू करावी त्यासाठी तेलामध्ये काजू ,कांदा हलका तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावा.नंतर त्यात थोड दही टाकुन यांची मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी.

नंतर आलं-लसूण पेस्ट घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. लाल तिखट, धनेपूड आणि मीठ घालून एक मिनिट शिजवावे. नंतर त्यात तळलेली पेस्ट घाला, 10 मिनिटे शिजवा आणि त्यानंतर कसुरी मेथी, मटार आणि मशरूम घाला.

पाच मिनिटे शिजवा, गरम मसाला घालावा, आणि हे मिश्रण चांगले मिक्स करावे. अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी टेस्टी लागणारे मटर मशरूम मसाला तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT