फूड

नाष्ट्यासाठी बनवा नान सँडविच रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - सँडविच कोणाला आवडत नाही? जो-तो नाष्ट्यात ते आवडीने खातो. आज आम्ही तुम्हाला स्वादिष्ट अशा नान सँडविच रेसिपीविषयी (Naan Sandwich Recipe In Marathi) सांगणार आहोत. यासाठी तुम्ही उरलेल्या नानचा वापरही करु शकता.

साहित्य

- २ उरलेले नान

- मिरची चटणी

- १/२ कप कांदा (बारीक केलेला)

- १/२ कप टोमॅटो

- १/२ कप काकडी

- १ उकडलेला बटाटा

- १ कप भिजवलेला सोयाबीन

- १/२ कप कांदा (बारीक कापलेला)

- १/२ कोथिंबीर

- १/२ टी स्पून लाल मिरची पावडर

- १/२ टी स्पून काळी मिरची पावडर

- २-४ मिरची (बारीक कापलेली)

- १ टी स्पून चाट मसाला

- २-३ टेबल स्पून बटर-चीज (किसलेला)

- चवीनुसार मीठ

कृती

- एका पॅनमध्ये थोडेसे चीज, कापलेला कांदा, लाल मिरची पावडर, काळी मिरची पावडर, कापलेली मिरची टाकून एकत्र करुन घ्या.

- चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यात उकडलेला बटाटा, भिजवलेला सोयाबीन टाकून बारीक करा

- थोडेसे सोया साॅस आणि चिली साॅसचा उपयोग करु शकता. हा पर्याय आहे.

- जेव्हा मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स होईल तेव्हा त्यात चाट मसाला आणि बारीक केलेली कोथिंबीर टाकून गॅसवरुन काढा.

- एका पॅनमध्ये चीज टाका आणि नानला क्रिस्पी आणि कडक होईपर्यंत गरम करा

- एका प्लेटवर पसरवा आणि एकत्र करा. पुदिन्याची चटणी पसरवा. पुन्हा कापलेला टोमॅटो, काकडी, कांदा टाका. वरुन मीठ, काळी मिरची, चाट मसाला आणि किसलेले पनीर टाका. फोल्ड करा आणि त्याची आनंद घ्या.

- पुढील सँडविचसाठी क्रिस्पी नान घ्या आणि त्यात पुदिन्याची चटणी, काही बटाट्यांचे फिलिंग पसरवा आणि वरुन काही चीज किसून घ्या. फोल्ड करा आणि त्याचा आनंद घ्या.

महत्त्वाचे घटक - उरलेले नान, मिंटची चटणी, कांदा, टोमॅटो, काकडी, उकडलेला बटाटा, भिजवलेला सोया, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मिरची, चाट मसाला, बटर-चीज, मीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT