टीम ई सकाळ 
फूड

सफरचंद कोसांबरी कधी खाल्ली का? अशी तयार करा घरी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपल्यापैकी अनेकांना सफरचंद आवडत असतो. रात्री जेवण झाल्यानंतर अनेकजण याचा आनंद घेत असतात. तसेच अनेकांनी सफरचंदाचा जूसही पिलेला आहे. याची चव एकदम छान असते. तसेही फ्रुट खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सफरचंद कोसांबरी. याचा तुम्ही स्नॅक म्हणून आस्वाद घेऊ शकता. हे दक्षिण भारतातील हा एक विशेष पदार्थ आहे. कोसांबरीमध्ये नारळ घातला की चव आणखीनच वाढते. कढीपत्ता आणि मोहरीचे दाणे टाकून तडका दिल्याशिवाय कोसांबरी तयार होत नाही.

घरी ही रेसिपी कशी तयार केली जाऊ शकते ते पाहूया. ही केवळ एक स्वादिष्ट स्नॅक रेसिपीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. कारण, त्यात बरीच फळे आणि पोषक समृद्धी डाळ टाकली जातात. ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर होते.

मुख्य सामग्री

दोन चिरलेला सफरचंद, एक चमचा मूग डाळ, एक चमचा उडीद डाळ, एक चमचा सूर्यफूल तेल, एक चमचा मोहरी, जिर, चिरलेले काजू, चिमूटभर हिंग, दोन कप किसलेले नारळ, डाळिंब, चिरलेली कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मीठ व कढीपत्ता.

अशी करा तयार

एका भांड्यात तूप घ्या, तूप गरम झाल्यानंतर जिरे, वाफवलेल्या मोहरी, हिंग, उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडे मीठ घाला. कोसंबी तयार झाल्यानंतर बाजूला ठेवा. आता एक मोठ्या वाट्यात चिरलेले सफरचंद, नारळ व डाळिंबाच्या बिया टाका. याला चांगले मिक्स करून मिश्रणात मोहरी टाका. दोन ते तीन चिमूटभर मीठ घाला. नंतर त्यात दोन ते तीन चमचे लिंबाचा रस टाका. आता सर्व साहित्य चांगले मिक्स करा. पूर्वी तयार केलेल्या तडका टाका आणि हिरव्या कोथिंबिरीने सजून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT