Nagpur news Make these four potato vegetables at home 
फूड

घरी तयार करा बटाट्याच्या या चार भाज्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : बटाट्याची भाजी सर्वांना आवडते. तसेही बटाटा कोणत्याही भाजीत टाकला जाऊ शकतो. यामुळे भाजीचे चव आणखीनच वाढते. लहान मुलांना बटाटा अधिकच आवडत असतो. ते बटाट्याच्या भाजीसाठी आग्रह करीत असतात. शाळेत जाताना डब्ब्‍यात याच भाजीची मागणी करीत असतात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बटाटाच्या चार वेगवेगळ्या भाज्या.

आपण सर्वांनी बटाट्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनविली आणि खाल्ली आहे. बटाट्याची भाजी चवदार असते. ती अनेक प्रकारे बनविली जाऊ शकते. मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी सोशल मीडियावर बटाट्याची भाजी बनवण्याचे चार मार्ग आणि पाककृती सांगितली आहे. आपणही बटाट्याची भाजी तयार करू पाहूया...

जिरे बटाटे

जिरे बटाटे तयार करण्यासाठी पाच बटाटे, अर्धा चमचा जिरे, हळद, मीठ व तेल.

बनविण्याची पद्धत

सर्वांत अगोदर बटाटे उकळून घ्या. कढईत दोन चम्मच तेल घेऊन जिरे शिजवा. यानंतर उकळलेले बटाटे टाका. बटाटा दोन्ही बाजूने चांगले तळून घ्या. बटाटे दोन्ही बाजूंनी चांगले तळल्यानंतर हळद, हिरवी मिरची, मीठ आणि तिखट घाला. हिरव्या धण्याने सजवून सर्व्ह करा.

कसुरी मेथी बटाटा

कसुरी मेथी बटाटा बनवण्यासाठी अर्धा चम्मच मेथीचे दाणे, पाच बटाटे, मीठ, अर्धा चम्मच कसुरी मेथी, लाल तिखट व तेल.

बनविण्याची पद्धत

कढईत तेल गरम केल्यानंतर मेथी दाणे टाका. मेथी सोनेरी झाल्यानंतर बटाटे आणि मीठ टाकून अर्धे शिजले की लाल तिखट टाका. बटाटे शिजत आल्यास कसुरी मेथी टाका व वरून हळद टाका.

चटपटे बटाटे

चटपटे बटाटे तयार करण्यासाठी बटाटे, जिरे, आल, तिखट, मीठ व तेल घ्या

बनविण्याची पद्धत

कढईत तेल घालून त्यात जिरे, हिंग, बारीक चिरलेले आले आणि मिरची घाला. हे मसाले तळले की त्यात बटाटे घाला. मसाला बनवण्यासाठी कोथिंबीर आणि जिरे तळून घ्या आणि मीठ, लाल तिखट आणि आंबा पूड घाला. बटाट्यावर सर्व मसाले घाला आणि थोड बेसण टाका. बटाटे शिजल्यावर गॅस बंद करा आणि बटाटे एका भांड्यात टाका.

धणे बटाटे

धणे बटाटे तयार करण्यासाठी जिरे, हिरवी मिरची, बटाटे, शंभर ग्राम धणे घ्या.

बनविण्याची पद्धत

एका भांड्यात तेल गरम करा. गरम तेलात जिरे व चिरलेली मिरची घाला. भांड्यात बटाटे टाकून तळून घ्या. वरून कोथिंबिरीची चटणी टाका. कोथिंबीर चटणीसाठी मीठ, हिरवी मिरची आणि मीठ घालून धनेला लिंबाचा रस घाला. बटाट्यात कोथिंबिरीची चटणी चांगले मिसळा. आता तुमचे धणे बटाटे तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT