National Cheese Day 2024 esakal
फूड

National Cheese Day 2024 : नाश्त्याला झटपट बनवा चवदार मसाला चीज मॅक्रोनी, वाचा 'ही' सोपी रेसिपी

National Cheese Day 2024 : मसाला चीज मॅक्रोनीची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे.

Monika Lonkar –Kumbhar

National Cheese Day 2024 : सकाळी नाश्त्याला रोज काय बनवावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. खास करून लहान मुलांना नाश्त्यामध्ये रोज नवीन आणि चविष्ट काय बनवायचे? असा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. मुलांना सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळ आणि टेस्टी खायला हव असत. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये मसाला चीज मॅक्रोनी बनवू शकता.

ही मसाला चीज मॅक्रोनीची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. आज देशभरात ‘राष्ट्रीय चीज दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या चीज दिनानिमित्त आपण मसाला चीज मॅक्रोनीची ही सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी बनवायला फार साहित्याची गरज पडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चीज मसाला मॅक्रोनीची सोपी रेसिपी.

चीज मसाला मॅक्रोनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • मॅक्रोनी २ कप

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ शिमला मिरची बारीक चिरलेली

  • आले किसलेले

  • १ टोमॅटो बारीक चिरलेले

  • १ चमचा चाट मसाला

  • काश्मिरी मिरची १ चमचा

  • काळी मिरी १ चमचा

  • ओरिगॅनो १ चमचा

  • टोमॅटो सॉस १ चमचा

  • चवीनुसार मीठ

  • चीज

चीज मसाला मॅक्रोनी बनवण्याची सोपी पद्धत :

  • चीज मसाला मॅक्रोनी बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये मॅक्रोनीमध्ये अंदाजे पाणी घालून प्रमाणानुसार तेल घाला.

  • त्यानंतर, हे मिश्रण चांगले शिजवून घ्या. २-३ मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या.

  • मॅक्रोनी थंड झाल्यानंतर चाळणीच्या मदतीने गाळून घ्या. यामुळे, मॅक्रोनी मोकळी होईल.

  • आता मॅक्रोनीचा मसाला बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घाला. त्यामध्ये किसलेले आले, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घाला.

  • हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्या आणि १०-१५ मिनिटे शिजू द्या.

  • आता या मिश्रणात चीज घाला. त्यानंतर, काळी मिरी पावडर, काश्मिरी मिरची, चाट मसाला, ओरिगॅनो, टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घाला.

  • हे सर्व मिश्रण चांगले शिजल्यानंतर शेवटी मॅक्रोनी यात मिसळा.

  • आता हे मिश्रण २ मिनिटांपर्यंत चांगले शिजवून घ्या. त्यानंतर, यावर चीज किसून  घाला आणि गरमागरम चीज मसाला मॅक्रोनी नाश्त्याला सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT