Navratri 2023 esakal
फूड

Navratri 2023 : उपवासाचा एवढा सोप्पा अन् पोट भरणारा पदार्थ तुम्ही पाहिला नसेल, १० मिनिटात बनवा पोटॅटो ट्रँगल्स!

घरच्या साहीत्यातच तयार होतो हा पदार्थ

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : नवरात्रीच्या उत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. काल म्हणजे रविवारपासून पुढील मंगळवार पर्यंत नवरात्रीचे उपवास केले जातात. या उपवासाला नवरात्र देखिल म्हणतात. ग्रामिण भागात ग्रामदैवत असलेल्या देवांचे नवरात्र केले जाते.

या नऊ दिवसात उपवास करणाऱ्यांपुढे असा प्रश्न असतो की रोज वेगळं करायचं काय? कारण, खिचडी आणि वरी यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बटाटा हा एकमेव पर्याय उरतो. जर तुम्ही बटाट्याचा विचार करत असाल तर पोट भरणारा एक पदार्थ कसा बनवायचा ते आज पाहुयात.

आजवर तुम्ही मैदा अन् मायोनिज, चीज घातलेले क्रिस्पी ट्रँगल्स खाल्ले असतील. तसाच पदार्थ तुम्ही उपवासालाही बनवू शकता. जो तितकाच कुरकुरीत आणि चवदार असतो. 

साहीत्य – साबुदाणा पिठ, बटाटे, मिरची, मीठ, इच्छेनुसार मसाले

कृती

  • सर्वात आधी बटाटे उकडण्यास ठेवा

  • त्यानंतर साबुदाण्याचे पीठ घ्या. पीठ तयार नसेल तर साबुदाना मिक्सरमधून बारीक करून घ्या. मिरची, जिरे एकत्र बारीक वाटून घ्या.

  • आता उकडलेले बटाटे घेऊन त्यात साबुदाण्याचे पीठ, मिरची पेस्ट, मीठ आणि थोडी साखर घालावी. तसेच बारीक चिरून कोथंबीरही घालावी.

  • हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा बनवा.पोळपाटावर हे पीठ घेऊन ते जाडसर गोलाकार थापून घ्या. आता पिठाचे पिझ्झासारखे छोटे पिस कापून घ्या.

  • हे पिसेस कमी तेलात फ्राय करून घ्या. मंद आचेवर तळून घेऊन काढून घ्या. आपले पोटॅटो ट्रँगल रेडी आहेत. गरम असतानाच फोडणी दिलेल्या दहीसोबत तुम्ही ते सर्व्ह करू शकता.  (Navratri 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Update : आज कुठे काय घडलं? पाहा एका क्लिकवर...

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

SCROLL FOR NEXT