Sakal
फूड

Navratri Fast Recipe: नवरात्रीत बनवा राजगिऱ्यापासून स्वादिष्ट पुरी, नोट करा रेसिपी

Rajgira Puri Recipe: आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. सकाळी नाश्त्यात साबुदाणा खायचा नसेल तर राजगिरा पुरी बनवू शकता. पुरी बनवणे खुप सोपे आहे.तसेच कमी वेळेत तयार होते.

Puja Bonkile

Rajgira Puri Recipe:  शारदीय नवरात्री सुरू होऊन 6 दिवस पुर्ण झाले आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीत सकाळी नाश्त्यात साबुदाणा खायचा नसेल तर स्वादिष्ट आणि आरोग्यदायी राजगिरा पुरी बनवू शकता. यात अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच राजगिरा पुरी बनवणे खुप सोपे असून लवकर तयार होतात.

राजगिरा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच पचनक्रिया सुरळितपणे कार्य करते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. तसेच कोलेस्टॉलची पातळी नियंत्रणात ठेवते. चला तर मग जाणून घेऊया राजगिरा पुरी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

राजगिरा पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

राजगिरा पीठ

बटाट

सैंधव मीठ

पाणी

तेल

राजगिरा पुरी बनवण्याची कृती

सर्वात आधी बटाटे उकळून घ्यावे.

नंतर थंड करून बारिक करून घ्यावे.

बारिक केलेल्या बटाट्यामध्ये राजगिरा पीठ मिक्स करावे आणि चांगले मळून घ्यावे.

15 मिनिटे झाकण ठेवून बाजूला ठेवा.

मिश्रणाचे लहान ते मध्यम आकाराचे गोळे करा. झाकण किंवा कापसाच्या रुमालाने झाकून ठेवा.

पीठ लावून पुरी लाटून घ्यावी आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT