Navratri Fast Recipe Sakal
फूड

Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा दही-आलू, नोट करा रेसिपी, दिवसभर राहाल उत्साही

Navratri Fast Recipe: तुम्हाला यंदा नवरात्री उपवासात शाबुदाण्यासोबत दही बटाटा खाऊ शकता. दही बटाटा बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे.

Puja Bonkile

Navratri Fast Recipe 2024: आज देशभरात शारदीय नवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. अनेक लोक या दिवसांमध्ये उपवास करतात. तुम्हाला यंदा नवरात्री उपवासात शाबुदाण्यासोबत दही बटाटा खाऊ शकता. दही बटाटा बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. तुम्ही फक्त दही बटाटा किंवा पुरीसोबत खाऊ शकता.चला तर मग जाणून घेऊया दही-बटाटा कसा बनवतात.

दही- आलू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 2चमचे तूप

1 टीस्पून जिरे

1 टीस्पून काळी मिरी

2-3 बटाटे उकडलेले

1/2 टीस्पून रॉक मीठ

1/2 टीस्पून तूप

1/2 टीस्पून जिरे

1 हिरवी मिरची, तुकडे

1 टीस्पून आले

1/2 टीस्पून काळी मिरी, मॅश

2 चमचे गव्हाचे पीठ

1 कप दही

दही- आलू बनवण्याची कृती

दही आलू नवरात्रीत खाऊ शकता.

दही आलू खाल्याने पोटात थंडावा राहतो

शरीरला ऊर्जा मिळते

दही बटाटा बनवण्यासाठी सर्वात आधी कढईत तूप टाकून गरम करा.

जिरे घालून परतून घ्या.

त्यात काळी मिरी ठेचून तळून घ्या.

आता उकडलेले बटाट्याचे तुकडे आणि काळे मीठ घालून मिक्स करा.

बटाटे पॅनमध्ये तळून घ्या.

दुसऱ्या पातेल्यात तूप घेऊन त्यात जिरे, हिरवी मिरची, आले आणि ठेचलेल्या काळ्या मिरच्या घाला.

ते तळून घ्या आणि त्यात गव्हाचे पीठ घाला.

सर्व साहित्य चांगले मिसळा.

आता त्यात एक कप दही घाला आणि त्यात एक कप पाणी देखील घाला.

चांगले हलवा.

आता त्यात तळलेले बटाटे घालून मिक्स करा.

हिरव्या मिरच्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.

दही आलू खाल्याने पोटात थंडावा राहतो

शरीरला ऊर्जा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT