Navratri Special Recipe esakal
फूड

Navratri Special Recipe : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ट्राय करा झटपट बनणारा बटाट्याचा पराठा

रोज रोज उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही शाबुदाणा खिचडीऐवजी बटाट्याचा पराठा ट्राय करू शकता

साक्षी राऊत

Navratri Special Recipe : आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. काही लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास ठेवतात. रोज रोज उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही शाबुदाणा खिचडीऐवजी बटाट्याचा पराठा ट्राय करू शकता.

बटाट्याचा पराठा बनवण्यासाठीचे साहित्य

१ कप शाबुदाणा

२ उकळलेले बटाटे

कुटलेली लाल मिर्ची एक चमचा

जिरे

काळे मीठ

कोथिंबीर बारीक कापलेली

तूप

बनवण्याची पद्धत

सगळ्यात आधी बटाटे उकळून चांगले मॅश करून घ्या.

आता शाबुदाणा पॅनमध्ये घालून ड्राय रोस्ट करा. ज्यामुळे त्यातील चिकटपणा जाण्यास मदत होईल.

आता मिक्सरमध्ये शाबुदाणा बारीक करून घ्या.

आता शाबुदाण्याची पावडर प्लेटमध्ये काढा. आणी मॅश केलेले बटाटे त्यात मिसळा.

त्यात बारीक कापलेली कोथिंबीर घाला.

कुटलेली लाल मिर्ची आणि काळे मीरेही घाला.

आता जीरे आणि रॉक सॉल्ट घालून मिक्स करून घ्या.

आता बटाटे आणि शाबुदाण्याच्या पावडरचे पीठ नीट मळून घ्या.

गरज पडल्यास पाणी घ्या नाहीतर बटाट्याच्या मदतीने पीठ मळून घ्या.

तवा गॅसवर ठेवून गरम करा. आणि पराठा लाटण्याच्या तयारीला लागा.

हा पराठा चिकटू नये म्हणून गॅस ओट्यावर बटर पेपर किंवा स्वच्छ टॉवेल पसरवा त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा ठेवा. त्यावर आणखी एक बटर पेपर किंवा स्वच्छ टॉवेल ठेवून पराठा लाटून घ्या.

आता हळून हा पराठा ताव्यावर ठेवून त्यावर तूप घाला. आणि सोनेरी होतपर्यंत शिजू द्या.

तुमचा टेस्टी बटाट्याचा पराठा अगदी रेडी आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या किंवा नारळाच्या चटणीसह हा पराठा खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT