Neelima Nitin recipe food Summer coolers sakal
फूड

समर कूलर्स

सकाळ वृत्तसेवा

- नीलिमा नितीन

आठ मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा केला. महिला या दीन नाहीत तर सशक्त आहेत, अतिशय प्रभावी आहेत याचं एक उदाहरण परवाच मी सिग्नलवरती पाहिलं. लाल सिग्नल लागलेला होता, आणि एक दुचाकीस्वार आपल्या बायकोसह थांबलेला होता.

अचानक त्यानं सिग्नल मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला; पण त्या स्त्रीनं त्याला तसे करण्यापासून सहज थांबवलं. एक विचार डोक्यात आला, की जर त्या स्त्रीप्रमाणे इतर सर्व स्त्रिया अशा जागरूक झाल्या, तर काय बिशाद आहे कोणाची कोणतेही नियम मोडायची?

बरं, यासाठी कुठली जबरदस्ती करायचीही गरज नाही लागणार. अगदी हसतखेळत, नकळत सगळे नियम व्यवस्थित पाळले जातील. आहे की नाही कमाल स्त्रीची! ही स्थिती घराबाहेरच नाही, तर घरातही सहजपणे आपल्याला दिसून येतं.

एखाद्या स्त्रीनं जर ठरवलं, की आहार समतोल असावा, हेल्दी खावं तर आपसूकच/ साहजिकच अख्खं घर नकळतपणे हेल्दी खायला लागतं. त्यासाठी त्या स्त्रीला अनेक उपाय करावे लागतात. वेगवेगळ्या पद्धतीनं पदार्थ खाऊ घालावे लागतात. त्यासाठी लागणारी सर्व मेहनत घरातली स्त्री नेहमीच घेत असते.

आता उन्हाळा येतोय तेव्हा काही उन्हाळ्याच्या खास हेल्दी रेसिपीज आपण बघणार आहोत. ज्या सहज सोप्या पद्धतीने करता येतील आणि अख्या कुटुंबालाही आवडतील. या रेसिपीचं वैशिष्ट्य असं, की तुम्ही यात तुमच्या आवडीप्रमाणे बरेच बदल करू शकता. तुमच्या आवडीची सीजनल, सहजरित्या मिळणारी फळं वापरू शकता.

साहित्य : एक मोठी वाटी (२५० ग्रॅम) ताजं घट्ट गोड दही, दोन -चार चमचे मध, दोन चमचे राजगिऱ्याच्या लाह्याचं पीठ, आपल्या आवडीच्या फळांची उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी, केळी, आंब्याची प्युरी; ड्रायफ्रूट्स.

कृती : प्रथम एका बाऊलमध्ये दही, राजगिऱ्याच्या लाह्यांचं पीठ, मध मिक्स करा.

तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्सचे बनवायचे असेल, तर त्याप्रमाणे त्याचे भाग करा व त्यात आपल्या आवडीच्या फळाची प्युरी, तुकडे मिक्स करा. हे दही फ्रिजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवून द्या.

वरून ड्रायफ्रूट्स पेरून ते सर्व्ह करा. विविधरंगी थंडगार फ्लेवर्ड दही हे उन्हाळ्यात आईस्क्रीमला अतिशय उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT