फूड

Butter Garlic Chicken Recipe : न्यू इयर पार्टीसाठी काय बनवायचंय सुचत नाही? ट्राय करा टेस्टी बटर गार्लिक चिकन

न्यू इयर पार्टीसाठी ट्राय करा टेस्टी बटर गार्लिक चिकन...

Aishwarya Musale

जर तुम्ही नॉनव्हेजचे शौकीन असाल आणि यावर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी घरी पार्टी करणार असाल तर बटर गार्लिक चिकनची ही रेसिपी तुमच्या पार्टीची मजा द्विगुणित करणार आहे. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे.

याशिवाय, ही ग्लूटेन फ्री रेसिपी तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या काही घटकांचा वापर करून फक्त 30 मिनिटांत तयार केली जाऊ शकते. तुम्ही बटर गार्लिक चिकन भात, रोटी किंवा नूडल्ससोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग आता उशीर न करता बटर गार्लिक चिकन कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

बटर गार्लिक चिकन बनवण्यासाठी साहित्य-

  • 500 ग्रॅम बोनलेस चिकनचे समान आकाराचे तुकडे करा

  • 3 चमचे मध

  • 3 चमचे लोणी

  • 2 चमचे बारीक चिरलेला लसूण

  • 1 टीस्पून मीठ

  • ½ टीस्पून काळी मिरी पावडर

  • 2 चमचे अँपल व्हिनेगर

  • 2 चमचे ऑलिव्ह ऑइल

बटर गार्लिक चिकन कसे बनवायचे-

बटर गार्लिक चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मध, बटर, लसूण, मीठ, काळी मिरी पावडर आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एकत्र करून घ्या.

नतंर मीडियम हाय प्लेमवर कढईत ऑलिव्ह तेल गरम करा. पॅनमध्ये चिकनचे तुकडे घाला आणि सुमारे 5 मिनिटे शिजवा. यानंतर गॅसची फ्लेम कमी करा.

नतंर मध आणि बटरचे मिश्रण पॅनमध्ये ठेवा आणि ते चिकन सॉसमध्ये चांगले मिसळेपर्यंत ढवळत रहा.

आता 3-4 मिनिटे सतत ढवळत असताना सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा. तुमचा चविष्ट बटर गार्लिक चिकन तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT