Paneer Popcorn Recipe Esakal
फूड

Paneer Popcorn Recipe: घरच्या घरी तयार करा टेस्टी पनीर पॉपकॉर्न ...

पनीरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं.

सकाळ डिजिटल टीम

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं. यात फॅट्स पण असतात. अशावेळी आपल्या आहारात पनीरचा योग्य पद्धतीनं वापर कसा करावा. हे माहिती असणं आवश्यक आहे. पनीरमुळे प्रथिनं मिळतात. पनीरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं.  तसेच ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण  वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला दिला जातो. जे नियमीत व्यायाम करतात त्यांनी पनीर खाणं गरजेचे असतं. आजच्या लेखात आपणघरच्या घरी  टेस्टी पनीर पॉपकॉर्न कसे तयार करायच्या याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

एक पाव पनीर 

एक कप बेसन

आले-लसूण पेस्ट

हळद 

काश्मिरी लाल तिखट

काळी मिरी 

बेकिंग सोडा 

अर्धा वाटी ब्रेड क्रंब्स 

ओवा

चवीनुसार मीठ

कृती:

पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे तुकडे एका भांड्यात चौकोनी कापून ठेवा. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची, ओवा, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून हे मसाले हलक्या हाताने पनीर मध्ये मिक्स करा. आता दुसरे भांडे घ्या. त्यात बेसन, काश्मिरी तिखट, बेकिंग सोडा, हळद आणि आले-लसूण पेस्ट घालून सर्व काही चांगले मिक्स करा. यानंतर या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून जाडसर बॅटर तयार करा आणि चांगले मिक्स करा. हे लक्षात ठेवा की पीठ नीट गुळगुळीत आणि गुठगुळी मुक्त असावे. आता या बॅटर मध्ये पनीरचे चौकोनी तुकडे बुडवून ब्रेड क्रंबमध्ये चांगले कोट करा आणि तळून घ्या. पनीर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. त्याच प्रमाणे सर्व पनीरचे चौकोनी तुकडे तळून घ्या. तुमचे पनीर पॉपकॉर्न तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT