Papua New Guinea food Sakal
फूड

Papua New Guinea : परदेशातही भारतीय अन्नाचा डंका; व्हेज कोल्हापुरीसह आणखी काय काय होतं मेजवानीमध्ये...

या नेत्यांसाठी भारतात पिकणाऱ्या धान्यांची मेजवानी ठेवण्यात आली होती.

वैष्णवी कारंजकर

पापुआ न्यू गिनी येथे तिसर्‍या इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या परिषदेसाठी येणाऱ्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी खास भारतीय पदार्थही बनवण्यात आले होते.

या नेत्यांसाठी भारतात पिकणाऱ्या धान्यांची मेजवानी ठेवण्यात आली होती. मिलेट्समध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी यांचा समावेश होतो. पंतप्रधान मोदींनी जी मेजवानी ठेवली होती, त्यामध्ये तीन प्रकारच्या मिलेट्सपासून बनवलेले पदार्थ होते. फक्त जेवण नव्हेत, तर इतरही स्नॅक्सचा समावेश यामध्ये होता.

कोणकोणते पदार्थ होते?

खांडवी - हा एक गुजराती पदार्थ आहे. बेसन आणि ताक वापरून हा पदार्थ बनवला जातो आणि वाफेवर शिजवला जातो.

मिलेट्स आणि भाज्यांचं सूप - मक्याच्या रोटीसोबत हे सूप सर्व्ह केलं जातं. हा भारतीय पदार्थ नसून एक परदेशी पदार्थ आहे, मात्र भारतीय मिलेट्सपासून बनलेला आहे.

मलई कोफ्ता व नाचणी करी - राजस्थानी रागी गट्टा करी आणि भारतातला प्रसिद्ध मलई कोफ्ताही परदेशी पाहुण्यांसाठी होता.राजस्थानी गट्टा करी नाचणी आणि बेसनच्या भज्यांना एका आंबट अशा ग्रेव्हीमध्ये शिजवून सर्व्ह केली जाते.

व्हेज कोल्हापुरी - व्हेज कोल्हापुरी ही भाजी प्रसिद्ध आहे. टोमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये भाज्या शिजवल्या जातात.

दाल पंचमेल - ही मेवाड शैलीतली खास डाळ आहे.

बाजरी बिर्याणी - बार्नयार्ड बाजरीपासून बनलेली ही व्हेजिटेबल बिर्याणी आहे.

फुलके - हे गव्हाच्या पीठापासून बनलेले असतात.

मसाला ताक - दही आणि काही भारतीय मसाले टाकून बनवलेलं ताक भारतात प्रसिद्ध आहे.

पान कुल्फी आणि मालपुआ - स्वीट्स म्हणून पान फ्लेवरची कुल्फी आणि मालपुआचा आस्वाद पाहुण्यांनी घेतला.

चहा - मसाला चहा, ग्रीन टी, पुदीना चहा, पीएनजी कॉफी यांचाही मेन्यूमध्ये समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT