फुड 
फूड

अस्सल गावरान चवीची वरण्याची (पावटा) बिनतेलाची आमटी

आता यात वेगळेपण काय असे तुम्ही विचाराल, मात्र हे आमटी बिनतेलाचीही बनवता येते.

स्नेहल कदम

सध्या रानात वरण्याच्या शेंगाचा बहर आलायं. साधारणत: दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारी, फेब्रुवारी अखेरपर्यंत हा गावठी वरण्याचा बहर असतो. यादरम्यान येणाऱ्या सणासुदीलाही याची आमटी आणि भाजी करण्यासाठी वापर होतो. ग्रामीण भागात भात शेतीत किंवा उसाच्या शेतीत याची लागवड होते. शेतकरी माकडांपासून याचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. बऱ्यात शेतकऱ्यांना यामुळे नुकसानही सोसावे लागते. अलीकडे या कारणामुळेच या लागवडीचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे पर्याय म्हणून घरामागील परसात याची लागवड करण्याचे प्रमाण मात्र हल्ली वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी गृहीणी 'आज आमच्यात पावट्याची आमटी आहे, असं आपल्या मैत्रिणींना किंवा शेजारी सांगताना दिसतात. आता यात वेगळेपण काय असे तुम्ही विचाराल, मात्र हे आमटी बिनतेलाचीही बनवता येते. ती कशी बनवावी याची सोपी रेसिपी आज आम्ही सांगणार आहोत. चला तर मग झटपट तयार होणारी बिनतेलाची वरण्याची आमटी कशी बनवावी ते पाहुया...

साहित्य -

  • वरणा (ओल्या पावट्याच्या शेंगा) - १ किलो

  • लाल तिखट (चटणी) - ४ चमचे

  • ज्वारीचं पीठ - ४ चमचे

  • मीठ - चवीनुसार

  • चिरलेली बारिक कोथंबीर - आवश्यकतेनुसार

कृती -

सुरुवातीला शेंगा सोलून त्यातील दाणे वेगळे करुन घ्या. यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या. एका बाजुला पाणी गरम करत ठेवा. शक्य झाल्यास ही आमटी (डिस्कीत) अॅल्युमिनिअमच्या भांड्याचा एक प्रकार आहे. यात या आमटीची रेसिपी करुन पहा. पाणी उकळल्यानंतर यात शेंगाचे दाणे टाका. ते काही काळासाठी शिजू द्या. याच भांड्यावर गरम पाणी करण्यासाठी एक बाऊल ठेवा. त्या बाऊलमध्ये वाफेवर पाणी गरम करुन आवश्यकतेनुसार लाल तिखट घाला. हे चटणीचे पाणी त्या भांड्यात ओता. आता ही चटणी थोडावेळ शिजू द्या. ही कृती परत एकदा करा. यावेळी मात्र गरम पाण्याच्या बाऊलमध्ये ज्वारीचं पीठ घाला. हे पीठ त्या पाण्यात हाताने मिक्स करुन घ्या. यानंतर ते पीठाचे पाणी उकळलेल्या आमटीच्या मिश्रणात ओता. वरून चवीनुसार मीठ टाका. गार्निंशिंगसाठी चिरलेल्या बारिक कोथिंबीरीचा वापर करा. गरमा गमर आमटी पांढरा भात आणि भाकरी सोबत सर्व्ह करा.

टीप -

आमटी तयार करण्याची पद्धत ही ग्रामीण भागातील आहे. आजही अनेक भागात ही बिनतेलाची आमटी चवीने खाल्ली जाते. तसेच शाकाहारी पार्टीसाठी हा बेत असतो. शक्य झाल्यास ही आमटी चुलीवर करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन हीची गावरान चवीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT