Pickle Esakal
फूड

Kitchen Hacks: लोणच्यात जास्त मीठ पडलयं? वापरा या टिप्स

लोणचे बनवत असताना मीठ जादा पडले तर तुम्ही व्हिनेगर वापरू शकता.

सकाळ डिजिटल टीम

लोणच (Pickle) म्हटंल कि तोंडाला पाणी सुटते. काहींना लोणच खायची इतकी सवय असते की नियमित जेवणात लोणचं नसेल तर जेवल्याचे समाधान वाटंत नाही. आंबा, फणस, मिरची, गाजर, कोबी, लिंबू, मुळा याची तर चवच भारी असते. उन्हाळ्याच्या हंगामात तर प्रत्येक गृहिणी घरी लोणचे बनवते. पण हे बनवताना कधी कधी बिघडू शकते. जसं कि मीठ जादा पडणे. (Pickle Extra Salt) स्वयंपाक करताना मीठ जर जादा झाले तर एखाद्या वेळी चालूनही जाते. पण जर लोणच्यात मीठ जास्त असेल तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न गृहीणींना पडतोच. कारण नियमित स्वयंपाक करणे हे वेगळे आणि लोणचे बनवणे हे वेगळे. कारण ते वर्षभर टिकावं असच बनवाव लागत. प्रत्येकाची बनवण्याची स्टाईल जरी वेगळी असली तरी हा वेळखाऊ प्रकार आहे. याला बनवताना गडबड करून चालत नाही. मात्र जर खुप श्रम करून बनवलेले लोणचे बिघडले किंवा त्यात मीठ पडले तर? काळजी करू नका तुम्हाला आजच्या भागात मीठ जरी जादा झाले तर यावर काय करावे याच्या टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

लसूण लोणचे मिक्स

लसणाचे लोणचे खाण्यास चविष्ट असतेच शिवाय याला बनवण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. लोणच्यामध्ये जर जास्त मीठ असेल तर लसणाचे लोणचे (मीठ न घालता बनवलेले) मिक्स करू शकता. यामुळे तुमच्या लोणच्यातील मीठ संतुलित राहील आणि लोणच्याची चवही वाढेल.

व्हिनेगर घाला

लोणचे बनवत असताना मीठ जादा पडले तर तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. व्हिनेगर मीठाच्या कडकपणाचे बॅलेन्स करते. लिंबाच्या आंबट गोड लोणच्यामध्ये मीठ जास्त असेल तर त्यात उसाचा रस मिक्स करा.

लिंबाच्या रसात मिसळा

काही लोणची अशी असतात ज्यात तुम्ही लिंबाचा रस घालून मीठाचे प्रमाण कमी करू शकता. कारण लिंबाचा रस आंबट असतो आणि त्यात आंबट मिसळले तर त्यात मीठ कमी मिळू लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT