Pitru Paksha 2024 Sakal
फूड

Pitru Paksha: पितृपक्षात पितरांसाठी खीर का बनवली जाते? जाणून घ्या कारण अन् रेसिपी

Kheer Prasad Recipe: पितृपक्षात काही नियम सांगितले आहेत. ज्यांचे पालन केल्यास अनेक समस्या दूर होऊन , पितृदोषापासून मुक्ती मिळेल.

Puja Bonkile

Pitru Paksha Kheer Prasad Recipe: हिंदू पंचांगानुसार यावर्षी पितृ पक्ष 17 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. २ ऑक्टोबरला संपणार आहे. पितरांसाठी केले जाणारे उपाय हे या 15 दिवसांत केले जातात. या दिवसात केलेले उपाय हे फलदायी ठरतात अशी मान्यता आहे.

मान्यतेनुसार पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात आणि आशीर्वाद देतात. या दिवसांमध्ये लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण,पिंडदान आणि ब्राम्हणांना अन्नदान करतात. पितृपक्षात खीरचा नैवेद्य बनवला जातो. पितृपक्षात खीर बनवण्याला खुप महत् आहे. चला तर मग जाणून घेऊया याचे महत्व आणि खीर बनवण्याची पद्धत काय आहे.

पितृ पक्षात खीर का बनवली जाते?

मान्यतेनुसार घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गोड पदार्थ खायला देऊन केले तर पाहुणे तृप्त होतात. याच भावनेने पितरांच्या पूर्ण तृप्तीसाठी खीर बनवली जाते. तसेच पिृतपक्षात खीर बनवण्यामागे कारण असे की पितृपक्षापुर्वी पावसाळा असतो. पूर्वीच्या काळी लोक पावसामुळे घरात राहत असे आणि उपवास करत असे. त्यामुळे शरीराला अशक्तपणा जाणवत असे. अशावेळी पिृतपक्षात १६ दिवस उपवास करणारे खीर-पुरू खाऊन शरीराचा अशक्तपणा दूर करत असे.

खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दोन लिटर दूध

एक कप नारळाची खिस

अर्धा कप साखर

एक कप काजू

दोन चमचे मनुका

१ वाटी तांदूळ

वेलची पावडर

खीर बनवण्याची कृती

खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईत तुप घालून सुकामेवा भाजून घ्यावे. नंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढावे.

नंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ तपकिरी होईपर्यंत तुपात भाजावे.

नंतर त्यात दूध मिक्स करावे.

दूधाला उकळी आल्यानंतर त्यात वेलची पावडर घालून चमच्याने ढवळावे.

त्यानंतर त्यात साखर मिक्स करावी. खीर नीट एकजीव करून मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर सुकामेवा मिक्स करून चमच्याने ढवळावे.

तयार तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT