Pitru Paksha 2023 esakal
फूड

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात श्राद्ध पूजेसाठी बनवा ही खास चविष्ट खीर, लगेच नोट करा रेसिपी

असे म्हटले जाते की गोड खाऊन ब्राम्हण, पितर आणि देवी-देवता तृप्त होतात. चला तर मग ही खीर बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी पूजा केली जाते. या काळात ब्राम्हणांना सात्विक जेवण खाऊ घातले जाते. या जेवणात खीर नक्की असते. खीर हा उत्तम असा स्वादिष्ट पदार्थ आहे. असे म्हटले जाते की गोड खाऊन ब्राम्हण, पितर आणि देवी-देवता तृप्त होतात. चला तर मग ही खीर बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

आज आपण दूधी भोपळ्याची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊया.

खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ कप किसलेला दूधी भोपळा

२ कप दूध

अर्धा चमचा विलायची पावडर

१ मोठा चमचा कापलेले ड्राय फ्रूट्स

१ छोटा चमचा तूप

अर्धा कप साखर

दूधी भोपळ्याची खीर बनवण्याची पद्धत

दूधी भोपळ्याची खीर बनवण्यासाठी आधी दूधी भोपळ्याचे वरचे साल काढून घ्या. आता दूधी भोपळा किसून घ्या. आता एका पातेल्यात दूध घालून स्लो फ्लेमवर गरम करा. एक दोन उकळीनंतर गॅस बंद करून घ्या. आता एका कढईत १ चमचा तूप घालून गरम होऊ द्या. या तूपात किसलेला दूधी भोपळा घालून शिजू द्या. जेव्हा दूधी भोपळा शिजून मऊ होईल त्यावेळी त्यात दूध घालून चमच्याने ढवळत राहा. (Recipe)

आता खीर कढईतील दूध घट्ट होतपर्यंत गॅसवर शिजवा. त्यात चवीनुसार साखर आणि विलायची पावडर घाला. त्यानंतर खीरमध्ये कापलेले ड्राय फ्रूट्स घालून ३-४ मिनिटे शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. तुम्ही ही खीर कढईतून काढून बाउलमध्ये काढून ड्राय फ्रूट्सच्या मदतीने गार्निश करू शकता. (Food)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Peace Talks : अमेरिका-इराणची २१ तासांची शांती चर्चा निष्फळ; होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम

Historical Discovery: १४० वर्षांपूर्वीच्या तलाव दुरुस्तीचा शिलालेख सापडला; साखरमधील माणेश्वर मंदिर परिसरातील १८८६मधील कामाची नोंद, पटवर्धन घराण्याचा संबंध अधोरेखित..

Pune Dinanath Mangeshkar Award: दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा २४ एप्रिलला

Eknath Shinde: ‘गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार’ शेतकऱ्यांना फायदेशीर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावणार!

Ayodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी सर्वात मोठी खुशखबर! १३ एप्रिलपासून राम मंदिर परिसरातील सर्व १८ मंदिरांचे दर्शन सुरू; असा मिळवा 'स्पेशल पास'

SCROLL FOR NEXT