सातारा : चटपटीत पदार्थ खाण्याच्या बाबतीत आपल्या देशाचा अग्र क्रमांक लागतो. त्यामुळे आपल्या देशात खुमासदार तळलेले पदार्थ ठिकठिकाणी पहायला मिळतात. मसालेदार पदार्थ ही भारतीयांची पहिली पसंत. त्यामुळे येथील बरेचसे लोक घरात चटपटीत पदार्थ बनवून खात असतात. भारतीय पाककृतीमध्ये दररोज चहासोबत क्रिस्पी पदार्थांची हमखास वर्णी असतेच, त्याशिवाय चहाला कोणतीच चव नाही, असे काहींचे म्हणणे आहे.
जेव्हा आपला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो, तेव्हा आपण काय शिजवायचे, कोणता पदार्थ बनवायचा याच्या आपण संभ्रमात, गोंधळात असतो. आपल्याकडे बटाटे चीप्स, समोसे, टिक्की आणि सर्व सामान्य भारतीय स्नॅक्स उपलब्ध असलेले पहायला मिळतात. जेव्हा-जेव्हा आपल्याला भूक लागेल, तेव्हा-तेव्हा या खास स्नॅक्सचा वापर प्रत्येकजण करत असतो. संध्याकाळच्या वेळी आपण हे पोहा फिंगर स्नॅक चहासोबत ही खाऊ शकता. ही एक सोपी रेसिपी असून आपल्याला 15 मिनिटांत घरीसुध्दा बनवता येते. जाणून घ्या या खास रेसिपीबद्दल..
पोहा फिंगरला फक्त 2 घटकांची आवश्यकता असते. ती म्हणजे, पोहा आणि बटाटा. उर्वरित सामान्य मसाले ते तयार करण्यासाठी वापरतात. हा तळलेला स्नॅक खायला खूपच स्वादिष्ट आणि रुचकर असतो, या पदार्थाला हाॅटेलमध्ये देखील खूप मागणी पहायला मिळते. टोमॅटो सॉस, हिरव्या चटणी किंवा अंड्यातील बलकासोबतही या पदार्थाची आपण मज्जा घेऊ शकता.
जाणून घ्या.. पोहे फिंगरची स्टेप बाय स्टेप कृती
पहिली स्टेप : 1 कप पोहे पावडरमध्ये बारीक करा.
दुसरी स्टेप : उकडलेले बटाटे सोलून घ्या आणि त्यात चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लसूण, एक चमचा बटर, लाल तिखट आणि चूर्ण पोहे घाला. हे सर्व चांगले मिक्स करुन घ्यावे व तद्नंतर त्यात थोडे चिकन पीठ घालावे.
तिसरी स्टेप : थोडी-थोडी कणीक घ्या आणि बोटाच्या सहाय्याने पट्ट्या बनविण्यासाठी रोल करा. सर्व रोल एकसारखे असणे गरजेचे आहेत, याचीही काळजी घ्या.
चौथी स्टेप : हे फिंगर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा व ते तळल्यानंतर त्यातील अतिरिक्त तेल बाहेर पडण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा.
पाचवी स्टेप : हे फिंगर तळून झाल्यानंतर ते एका भांड्यात काढून घ्या व आपल्या चविनुसार ते बटाटा चीप्स, समोसा व टिक्कीसोबत खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.