Poha Thalipeeth Recipe Esakal
फूड

Poha Thalipeeth Recipe : पोह्याचे थालीपीठ कसे तयार करायचे?

पोहे हे अतिशय चांगले प्रोबायोटिक अन्न आहे.

दिपाली सुसर

Poha Thalipeeth : पावसाळा आला की आपल्याला खमंग आणि गरम काहीतरी खावसं वाटतं. चला तर आजच्या लेखात मग पावसाळ्यात सकाळी सकाळी नास्ताला खमंग असे पोह्याचे थालीपीठ कसे तयार याची सविस्तर रेसिपी पाहू या..

पोहे हे अतिशय चांगले प्रोबायोटिक अन्न आहे. हे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि फायबर्समुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. पोहे वजन कमी करण्यात उपयुक्त आहे.

साहित्य

• एक कप जाड पोहे

• अर्धा कप गव्हाचे पीठ

• अर्धा कप बेसन

• कोथिंबीर 

• अर्धा चमचा तिखट

• अर्धा चमचा धणे पावडर

• एक चमचा जीरे पावडर

• एक चमचा ओवा

• एक चमचा तीळ

• अर्धा चमचा हळद

• हिंग

• मीठ चवीनुसार

कृती:

सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून थोड्या पाण्यात पंधरा-वीस मिनिटे भिजत घालावे.नंतर ते एका बाऊल मध्ये घेऊन चांगले स्मॅश करून घ्यावे. मग त्या बेसन व कणिक मीक्स करून त्यात तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, कोथिंबीर, हिंग, हळद, तीळ, ओवा टाकून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे मग गरजे नुसार पाणी घालू त्याचा माऊसर गोळे तयार करून तेलाने ग्रिसींग केलेल्या तव्यावर थालीपीठ थापून घ्यावे. दोन्ही बाजूंनी थालीपीठ चांगले खरपुस भाजून घ्यावे. हे गरमागरम थालीपीठ तुम्ही शेंगदाणा चटणी सोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT