Poli Ladu Recipe
Poli Ladu Recipe esakal
फूड

Poli Ladu Recipe : शिळ्या पोळ्या उरल्या आहेत? मग बनवा खास गुळाचा लाडोबा

सकाळ डिजिटल टीम

Poli Ladu Recipe : अनेकदा असं होत की, आदल्या दिवशी रात्री बाहेरूनच काहीतरी खाणं होतं, किंवा अंदाज चुकतो त्यामुळे शिळ्या पोळ्या उरतात. त्यांचं नक्की काय करावं हा प्रश्न असतोच. तसा, पोळीचा कुसकरा हा ऑप्शन असतोच पण त्याने अनेकदा ॲसिडीटी होते आणि मग नक्की काय करावं हा प्रश्न पडतो, यात तुम्ही गुळाचा लाडू करू शकतात आणि मुलांनी खावं म्हणून त्याला तुम्ही गुळाचा लाडोबा अस नावही देऊ शकतात.

साहित्य:

४ ते ५ आदल्या दिवशीच्या पोळ्या

४ चमचे किसलेला गूळ, किंवा चवीनुसार

३ चमचे साजूक तूप

कृती:

१) पोळ्यांचा कुस्करा करून मिक्सरमध्ये भरडसर फिरवून घ्या.

२) त्यात गूळ आणि तूप घालून चांगले मळा. गूळ, तूप आणि बारीक केलेली पोळी हे चांगले मिक्स करा.

३) आणि याचे छान छोटे छोटे लाडू वाळून घ्या.

टीप : या लाडूंमध्ये ड्रायफ्रुट्सची भरडसर पूड आवडत असल्यास घालू शकतो. तसच शोभेकरता बेदाणेही लावू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : काश्मीरमधील 4 दहशतवादाशी संबंधित मालमत्ता जप्त

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

Prajakta Mali : अखेर सही झाली! प्राजक्ता माळीच्या आयुष्यात घडतंय काय? म्हणते "आयुष्यातील सर्वात..."

SCROLL FOR NEXT