Potato Bread Rolls Sakal
फूड

Snack Recipe : अचानक घरी पाहुणे आलेत, त्यांच्यासाठी झटपट खायला काय बनवायचं?

काहीतरी खास बनवायचे आहे पण स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवायचा नाही. मग काय कराल?

वैष्णवी कारंजकर

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या महिन्यांत, लोक सहसा त्यांच्या कुटुंबासह नातेवाईक किंवा मित्रांना भेटायला जातात. अचानक आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्याची आगाऊ तयारी नसते. अशा परिस्थितीत पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही घरीच स्वादिष्ट पदार्थ बनवून त्यांना इम्प्रेस करू शकता. काहीतरी खास बनवायचं आहे पण स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवायचा नाही, असाच एक पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

झटपट चविष्ट स्नॅक्ससाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पाहुण्यांसाठी घरच्या घरी क्रिस्पी बटाटा ब्रेड बॉल्स बनवू शकता. त्याची रेसिपी सोपी आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही बनवता येते.

साहित्य

  • ब्रेड,

  • बटाटा,

  • लाल तिखट,

  • जिरे,

  • बडीशेप,

  • कोथिंबीर,

  • चिरलेली हिरवी मिरची,

  • तेल,

  • मीठ.

कृती

  • बॉल्स बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकडून घ्या.

  • आता उकडलेले बटाटे सोलून बाजूला ठेवा.

  • एका खोल भांड्यात उकडलेले बटाटे ठेवा आणि चांगले मॅश करा.

  • बटाट्यामध्ये लाल तिखट, बडीशेप, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घाला.

  • आता ब्रेडच्या चारही बाजू चाकूच्या मदतीने कापून त्या वेगळ्या करा.

  • ब्रेड फोडून बटाट्यात मॅश करा आणि संपूर्ण मिश्रण चांगले मिसळा.

  • तयार मिश्रण आपल्या तळहातावर घ्या आणि त्याला मॅश करून गोळ्यांचा आकार द्या.

  • आता एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा आणि त्यात गोळे सोनेरी होईपर्यंत तळा.

  • एका प्लेटमध्ये काढा आणि सॉस किंवा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT