Breakfast  sakal
फूड

Breakfast Recipe: 10 मिनिटांत नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे धिरडे, जाणून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्याची सुरुवात हेल्दी पदार्थ खाऊन करावी असे अनेकांना नेहमी वाटत असते.

Aishwarya Musale

रोजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी नेमकं काय हेल्दी आणि चविष्ट बनवावं हा प्रश्न अनेकदा सगळ्याच गृहिणींना सतावतो. काहीवेळा आपण रोजचे उपमा, पोहे, इडली चटणी असे पदार्थ खाऊन कंटाळतो. लहान मुलांचे तर नखरे वेगळेच. अशा वेळेस अडचणीत येते ती आईचं. नाश्ता हेल्दी पण झाला पाहिजे आणि पोटभर ही.

यासाठी तीची धडपड वेगळीच. पण काळजी करू नका अगदी १० मिनीटांत तयार होईल अशी रेसीपी तुम्हाला सांगणार आहोत. ते म्हणजे बटाट्यापासून तयार होणारे बटाट्याचे धिरडे. यासाठी वेगळं काही आणायची गरज नाही. घरातील आहे त्या वस्तू वापरून तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसीपी.

साहित्य

  • बटाटे : 4

  • गव्हाचे पीठ : 2 वाट्या

  • रवा : 4 चमचे

  • हिरवी मिर्ची : 4

  • लसून : 5 ते 6

  • अद्रक : छोटा तुकडा

  • हिंग, हळद : लहान छोटा चमचा/ चिमुटभर

  • चवीनुसार मीठ

  • कोथंबिर

कृती

सुरवातीला बटाट्याची साल काढून बारीक खिसून घ्या. त्यात गव्हाचे पीठ, रवा, हिरवी मिर्ची, लसून- अद्रक पेस्ट, हळद, हिंग चिमूटभर घाला. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तुम्हाला हिरवी मिर्ची आवडत नसेल तर लाल तिखट घालू शकता. आता यात मिठ घालून मिक्स करून घ्या.

हे मिश्रण खूप पातळ अथवा घट्ट करू नका. धिरडे कुरकुरीत व्हावे यासाठी यात रव्याचा वापर करावा. तयार झालेल पिठ अर्धा तास भिजत ठेवा. जर खूपच गडबड असेल तर रवा पाण्यात भिजवून पिठात मिक्स करा.

आता पॅन गरम करून त्यात तेल किंवा बटर टाकून धिरड्याचे पिठ टाकून त्यावर थोडी कोथंबिर टाकून हळूहळू पसरवून चांगले फ्राय करून घ्या. झाले तुमचे धिरडे तयार. हे तुम्ही दही किंवा साॅस सोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

SCROLL FOR NEXT