Prajakta Gaikwad sakal
फूड

ग्लॅम-फूड : ‘ताटात आलेला प्रत्येक पदार्थ आवडतो’

अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. म्हणून ताटात आलेला प्रत्येक पदार्थ मला आवडतो. अर्थात, तरीही सांगायचं म्हटलं, तर माझा आवडता पदार्थ हा पराठा आणि डाळीची खिचडी हा आहे.

प्राजक्ता गायकवाड

अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. म्हणून ताटात आलेला प्रत्येक पदार्थ मला आवडतो. अर्थात, तरीही सांगायचं म्हटलं, तर माझा आवडता पदार्थ हा पराठा आणि डाळीची खिचडी हा आहे. हे पदार्थ पटकन होतात आणि डाएट फ्री आहेत. शूटिंगच्या वेळी धावपळ करताना हे पदार्थ खूप लवकर बनवता येतात.

मला स्वतःलाही स्वयंपाकाची आवड आहे. मात्र, शूटिंगच्या धावपळीमुळे तितकासा वेळ मिळत नाही; पण जेव्हा मला सुट्टी असते, तेव्हा मी नक्कीच आईला स्वयंपाकात मदत करते आणि कधीकधी मीसुद्धा स्वयंपाक करते. मी मुगाच्या डाळीची भजी छान करते आणि घरात ती सगळ्यांना आवडतात. मला चपात्यासुद्धा छान जमतात. मी स्वयंपाकात नवशिकी होते, तेव्हा माझ्याकडून एकदा उपवासाची साबुदाणा खिचडी बिघडली होती. साबुदाणा जास्त भिजला होता आणि तो परतताना माझ्याकडून तूप जास्त पडलं होतं म्हणून साबुदाणा खिचडी बिघडल्याचं मला आठवतं. मात्र, आता मी ती छान करते.

मला असं वाटतं, की ताटात वाढलेला प्रत्येक पदार्थ आपण आनंदानं खायला हवा. कारण, अनेकांना दोनवेळचं जेवणसुद्धा मिळत नाही. मी कारली, दुधी भोपळासुद्धा आवडीनं खाते. माझी आई उत्तम स्वयंपाक करते. तिच्या हातचा माझा आवडता पदार्थ म्हणजे पावभाजी, पुरणपोळी आणि करंजी. माझी आई खारीच्या करंज्या करते, ज्या मी अजूनपर्यंत कुठंही खाल्लेल्या नाहीत. मी कधीही खाऊ शकते असा आवडता पदार्थ म्हणजे मसाला डोसा. डोसा मी सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही खाऊ शकते. डोशासोबत छान कोथिंबिरीची किंवा खोबऱ्याची चटणी, सांबार, बटाट्याची भाजी किंवा काही ठिकाणी अगदी टोमॅटोची भाजीसुद्धा दिली जाते तीसुद्धा फार चविष्ट लागते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अमरावतीत चुरशीची लढत, विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार, प्रवीण पोटेंना नेमकं कुणाचं आव्हान?

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

क्रिकेटविश्व हादरलं! वर्ल्ड कप खेळलेल्या देशावर ICC ची मोठी कारवाई, सदस्यत्व निलंबित केलं

JEE Exam Result : जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

आतापर्यंत खूप सोसलं आणि भोगलं ! फक्त येत्या 48 तासांत दोन राशींचा सगळा त्रास होणार दूर; सुवर्णकाळाची सुरुवात

SCROLL FOR NEXT