dhokala 
फूड

माझी रेसिपी- झटपट ढोकळा 

प्रमिला रासने

साहित्य - १.५ मध्यम वाटी पाणी, अर्धा चहाचा चमचा सायट्रिक ॲसिड, ६ चमचे साखर, ४ चमचे तेल, चवीनुसार मीठ, २.५ वाटी बेसन, १/४ चमचा खायचा सोडा. 

कृती - प्रथम एका भांड्यात पाणी आणि सायट्रिक ॲसिड घालावे व त्यानंतर वर सांगितलेले सर्व साहित्य क्रमाने एकावर एक घालून बेसन घालावे. एकसारखे सायट्रिक ॲसिड विरघळेपर्यंत हलवावे. शेवटी खायचा सोडा पाव चमचा घालून पुन्हा हलवावे. एका पसरट मोठ्या कढईत पाणी घालून स्टीलचे स्टॅण्ड ठेवावे. त्यावर एका थाळीला तेल लावून गरम करण्यास ठेवावे. थाळी थोडी गरम झाल्यावर तयार केलेले बेसनचे मिश्रण हलवून वरून ओतावे. कढईवर झाकण ठेवावे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. १५ मिनिटांनी ढोकळा खूपच फुलतो. एका पातेल्यात तेल, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी व त्यात १.५ वाटी पाणी घालावे, ५ चमचे साखर, मिरचीचे अगदी बारीक तुकडे घालावेत. थोडा वेळ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. ढोकळा झाल्यावर खाली काढून हव्या त्या आकारात कापावा. वरील फोडणी गरम ढोकळ्यावर मधील रेषांमध्ये व कडेला ओतावी. ५ मिनिटातच साखरेचे पाणी जिरून ढोकळा छान फुगून येईल. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. यासोबत कोथिंबीर, मिरची, पुदिन्याची हिरवी चटणी करून लिंबू पिळावे. चटणीसह ढोकळा सर्व्ह करावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात मॉब लिंचिंग! मुस्लिम तरूण इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच १०० जण आले; काठी-कोयत्यानं हल्ला अन्... घटनेनं खळबळ

मच्छीमारांना नव्या उत्पन्नाचा मार्ग खुला, रायगड किनारपट्टीवर शैवाल शेती सुरू; प्रशासनाचा नवा उपक्रम

Horoscope : नवा आठवडा, नवी सुरुवात! 16 मार्चचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; अचानक घरी येणार पैसा, ऐकायला मिळेल मोठी बातमी

Latest Marathi Live Update : पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची ISWAI तर्फे मागणी

5,50,00,00,000 इतकी आहे एकट्या आलियाची संपत्ती, 20 मिनिटाच्या सीनसाठी घेते 9 कोटी तर बिझनेसमधून कमावते पाण्यासारखा पैसा

SCROLL FOR NEXT